Indian Railways : भारतात रोज (Indian Railways) कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांतर तर रेल्वे या लाइफलाइन आहेत.रोज कोट्यावधी लोकांना घेऊन धावणारी भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकावर आहे. मागील काही वर्षांपासून रेल्वे वेगाने आपले रुप बदलत आहे.रेल्वेने प्रवास केला नाही असा व्यक्ती आपल्याकडे तसा सापडणार नाही. आपण प्रत्येकानेच कधी ना कधी तरी रेल्वेने प्रवास केला असेलच त्यावेळी असाही विचार केला असेलच ना की इतकी मोठी रेल्वेची किंमत असते किती (Train Making Cost), इंजिन तयार करण्यासाठी किती खर्च येतो, चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..
भारतीय रेल्वे दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करते.तसेच हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.रेल्वे प्रवाशांच्या सोयीचीही विशेष काळजी घेत असल्याने वेळोवेळी पद्धती बदलत राहते.प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी देशात नवीन सेमी हायस्पीड रेल्वे धावत आहेत.गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचे वेगाने आधुनिकीकरण होत आहे.
- IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांची घोर निराशा; पाकिस्तान संघाने घेतला ‘हा’ निर्णय
- PM-SHRI Scheme : शाळा होणार मॉडेल; ‘त्यासाठी’ मोदी सरकारने 9 हजार शाळा केल्या सिलेक्ट
- PF Balance : कंपनी तुमच्या खात्यात पीएफचे पैसे टाकते का ? ; ‘या’ सोप्या पद्धतींनी मिळवा माहिती
- Railway Fuel Pump : कुठे असतात रेल्वेचे पेट्रोल पंप ?, कसे भरतात इंधन ?, किती मिळतो मायलेज ?; वाचा..
- TV Viewing Distance : टीव्ही किती अंतरावरून पहावा ? ; तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना, जाणून घ्या..
देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली-वाराणसी मार्गावर सुरू झाली. दुसरीकडे, गांधीनगर कॅपिटल-मुंबई सेंट्रल मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) ट्रेन ही या ट्रेनची अपग्रेड आवृत्ती होती आणि प्रवाशांना आधीच्या वंदे भारतपेक्षा अधिक आणि चांगल्या सुविधा मिळतात. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, नवीन पिढीच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची किंमत सुमारे 115 कोटी रुपये आहे.
इंजिन तयार करण्याची किंमत
इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनवर चालणाऱ्या ट्रेन्स भारतात सहसा दिसतात. त्यांचे इंजिन तयार करण्यासाठी 13 ते 20 कोटी रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे, इंजिनची किंमत त्याच्या ताकदीवर असते. इंजिनानंतर ट्रेनच्या डब्यांबद्दल बोलायचे झाले तर ट्रेनचा डबा तयार करण्यासाठी सरासरी 2 कोटी रुपये खर्च येतो. सामान्य वर्गाचा डबा तयार करण्यासाठी लागणारा खर्च यापेक्षा थोडा कमी आहे, तर एसी कोच तयार करण्याचा खर्च त्याहूनही अधिक आहे.
संपूर्ण ट्रेनची किंमत
एका सामान्य पॅसेंजर ट्रेनला सरासरी २४ डबे असतात. यानुसार एका संपूर्ण ट्रेनच्या एकूण खर्चाचा अंदाज घेतला तर ती तयार करण्यासाठी सुमारे ६६ कोटी रुपये खर्च येतो. यामध्ये इंजिनची किंमत सरासरी १८ कोटी रुपये आहे आणि २४ डब्यांची किंमत २-२ कोटी रुपयांनुसार ४८ कोटी रुपये आहे.म्हणजेच तुम्ही सरासरी ६६ कोटी रुपये खर्चाच्या ट्रेनमधून प्रवास करता.