Indian Railway : देशात अशी अनेक रेल्वे स्टेशन्स (Indian Railway) आहेत, जी त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. काही रेल्वेस्टेशन (Railway Station) त्यांच्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध आहेत, तर अनेक स्टेशन्स आहेत जी त्यांच्या स्वच्छतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का भारतीय रेल्वेचे शेवटचे रेल्वे स्टेशन कोणते आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी काही स्टेशन्स अशी आहेत जी देशाच्या अगदी शेवटच्या टोकाला आहेत. जिथून तुम्ही अगदी सहज परदेश प्रवास करू शकता.
तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की असे कोणते रेल्वे स्टेशन आहे, जिथून पायी चालतही इतर देशांत जाता येते. बिहारमध्ये (Bihar) असे एक रेल्वे स्टेशन आहे, जे नेपाळ (Nepal) देशाच्या अगदी जवळ आहे. म्हणजे इथून खाली उतरल्यावर पायी चालत परदेशातही जाता येते. असेच एक रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्येही आहे.
पायी चालत कोणत्या देशात पोहोचता येते
हे रेल्वे स्टेशन बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे. अररिया जिल्ह्यात असलेल्या या रेल्वे स्टेशनचे नाव जोगबनी स्टेशन आहे, जे देशातील शेवटचे स्टेशन म्हणून पाहिले जाते. इथून नेपाळचे अंतर नाममात्रच आहे, हा देश इथून इतका जवळ आहे की लोक पायी चालतही तिथे जाऊ शकतात. चांगली गोष्ट म्हणजे भारतातील लोकांना नेपाळला जाण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टचीही गरज नाही. इतकेच नाही तर या स्टेशनवरून तुम्ही तुमच्या विमानाच्या खर्चातही बचत करू शकता.
येथून तुम्ही परदेशातही जाऊ शकता
पश्चिम बंगालचे (West Bengal) सिंहाबाद स्टेशन हे देशातील शेवटचे स्टेशन मानले जाते. दक्षिण भारतात, जिथे देशाची सागरी सीमा सुरू होते, तिथल्या स्टेशनला देशाचे शेवटचे स्टेशन देखील म्हटले जाते. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात बांधलेले सिंहाबाद स्टेशन हे भारतातील शेवटचे फ्रंटियर स्टेशन आहे. कधीकाळी हे स्टेशन कोलकाता आणि ढाका दरम्यान संपर्क प्रस्थापित करत असे.
येथून अनेक प्रवासी रेल्वेने ये-जा करत असत, परंतु आजच्या काळात हे स्टेशन पूर्णपणे सुनसान आहे. येथे कोणतीही ट्रेन थांबत नाही, त्यामुळे हे ठिकाण पूर्णपणे निर्जन राहते. या रेल्वे स्टेशनचा वापर फक्त मालवाहक रेल्वेच्या वाहतुकीसाठी केला जातो. सिंहाबाद रेल्वे स्टेशन आजही ब्रिटीशकालीन आहे. इथे आजही तुम्हाला कार्डबोर्डची तिकिटे दिसतील, जी आता कोणत्याही रेल्वेवर दिसत नाहीत. याशिवाय सिग्नल, दळणवळण आणि स्टेशन, टेलिफोन आणि तिकिटे यांच्याशी संबंधित सर्व उपकरणेही ब्रिटिशकालीन आहेत.