Indian Cricket : क्रिकेट सोडलं, पॉलिटिक्स सुरू केलं; राजकारणात ‘या’ खेळाडूंचं नशीब चमकलं

Indian Cricket : भारतीय क्रिकेट आणि राजकारण यांचं (Indian Cricket) नात अतूट आहे. चित्रपटातील अनेक स्टार्स राजकारणात आले. यातील अनेक जण यशस्वी झाले. काही जणांनी राजकारणात मोठी पदे भूषवली तर काही जण मात्र सुपरफ्लॉप ठरले. त्याचप्रमाणे क्रिकेटमधील अनेक खेळाडूंनी राजकारणाची सेकंड इनिंग सुरू केली. यातील अनेक खेळाडू आज राजकारणात स्थिरस्थावर झाले आहेत. तर काही जण अजूनही संघर्ष करत आहेत तर काही जणांचं राजकारणातील करियरही संपुष्टात आलं आहे. आज आपण अशाच काही माजी खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी राजकारणाचं मैदान गाजवलं.

नवज्योत सिंह सिद्धू

पंजाबच्या राजकारणात नवज्योत सिंह सिद्धू मोठं नाव आहे. सिद्धू क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भाजपने त्यांना अमृतसर मतदारसंघातून तिकीट दिलं. या निवडणुकीत सिद्धू विजयी होऊन संसदेत पोहोचले. सिद्धू 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत विजयी झाले. यानंतरही त्यांनी भाजप सोडून काँग्रेसी झाले. आता ते पुन्हा भाजपात येण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

Loksabha Elections । लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती होणार, ‘आप’ने केला मोठा दावा

Indian Cricket

सचिन तेंडुलकर

क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी खेळाडू म्हणून सचिनकडे पाहिलं जातं. सचिनने क्रिकेटनंतर राजकारणातही नशीब आजमावलं. एप्रिल 2012 मध्ये सचिन राज्यसभेचा खासदार झाला होता. परंतु, राजकारणातील त्याची इनिंग फारशी यशस्वी ठरली नाही.

Indian Cricket 

कीर्ती आझाद

भारतीय संघाने 1983 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता त्या संघात कीर्ती आझाद होते. क्रिकेटनंतर आझाद यांनी राजकारणात पाऊल ठेवले. भाजपाच्या तिकीटावर बिहारमधील दरभंगा मतदारसंघातून निवडणूक लढली आणि विजयी झाले. आझाद यांचे वडील राज्याचे मुख्यमंत्री होते. आझाद यांनी टीम इंडियासाठी 7 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Bank Loan । तुम्हीही बँकेला कर्ज देऊन करू शकता बक्कळ कमाई, कसं ते जाणून घ्या

Indian Cricket

गौतम गंभीर

टीम इंडियातील तापट स्वभावाचा खेळाडू म्हणून गौतम गंभीरकडे पाहिले जात होते. सिनियर असो की दिग्गज या सगळ्यांशीच गंभीरने पंगा घेतला. विराट कोहलीलाही भिडला. पाकिस्तानी खेळाडूंबरोबरचे त्याचे वाद तर नेहमीच चर्चेत राहायचे. असा हा गौतम गंभीर निवृत्त झाल्यानतंर राजकारणात आला. सध्या तो पूर्व दिल्ली मतदारसंघाचा भाजप खासदार आहे.

एस श्रीसंत

केरळचा जलदगती गोलंदाज शांतकुमारन श्रीसंत कायम वादामुळेच चर्चेत राहिला. मैदानावरचा त्याचा आक्रमकपणा नेहमीच नजरेत भरायचा. याच आक्रमकपणामुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबरोबर त्याचे खटके उडायचे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणामुळे श्रीसंताच्या भरात असलेल्या करियरला ब्रेक लागला. यानंतर श्रीसंत रियालिटी शो मध्येही दिसला. त्यानंतर सन 2016 मध्ये भाजपाच्या तिकीटावर श्रीसंतने विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावलं. मात्र येथेही त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

चेतन चौहान 

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर चेतन चौहान राजकारणात आले. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून त्यांनी 1991 आणि 1998 या दोन निवडणुकीत विजय मिळवला. सध्या चेतन चौहान राजकारणातच जास्त सक्रिय आहेत. अमरोहा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत.

Leave a Comment