मुंबई : भारतीय नागरिकांनी (Indian Citizenship) भारताचे नागरिकत्व सोडल्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. फक्त मागील तीन वर्षांत सुमारे 4 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले (people have given up their citizenship of India) आहे. अनेक उच्च पगारी नोकरदार, बडे व्यावसायिक आणि उद्योजक यांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे.
खरेदिवाला = ऑफरवाला #मराठी #खरेदि #शॉपिंग #ऑफरवाला #ऑफर #खरेदिवाला #Marathi #Kharediwala #shopping #offers #Offerwala pic.twitter.com/KTbNfMPOZ3
— Kharediwala (@Kharediwala1) July 19, 2022
मंगळवारी संसदेत सरकारने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारकडून (shared in response to a question from the government in Parliament) ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षात 3.9 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले असून हे लोक जगातील 103 देशांमध्ये स्थायिक झाले आहेत आणि तिथले नागरिकत्व त्यांना मिळाले आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. अमेरिका (America) ही बहुतांश भारतीयांची पसंती आहे, जिथे या लोकांनी नागरिकत्व घेतले आहे. एकट्या 2021 या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर 1.63 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (Union Home Ministry) अहवालानुसार, गेल्या वर्षी 78,000 हून अधिक लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे. 2019 मध्ये 61683 लोकांनी, 2020 मध्ये 30828, 2021 मध्ये 78284 लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे. त्याचवेळी, कॅनडा हा देश यात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे भारतीयांनी नागरिकत्व घेतले आहे. (Canada, Australia)
Vladimir Putin: म्हणून रक्ताने अंघोळ करतात पुतीन..! पहा नेमकी काय चर्चा आहे आरोग्याबाबत https://t.co/m4JojfwpQB
— Krushirang (@krushirang) July 19, 2022
कॅनडामध्ये 2019 मध्ये 25381, 2020 मध्ये 17093, 2021 मध्ये 21597 लोकांनी नागरिकत्व घेतले आहे. त्याच वेळी, 2019 मध्ये 21340, 2020 मध्ये 13518 आणि 2021 मध्ये 23533 लोकांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आहे. यानंतर यूके, इटली, न्यूझीलंड, जर्मनीचा क्रमांक लागतो जिथे सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व घेतले आहे. 2019 मध्ये 1.44 लाख भारतीयांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे, तर 2020 मध्ये 85256 लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. बसपा खासदार हाजी फजलुर रहमान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या लोकांनी वैयक्तिक कारणास्तव भारताचे नागरिकत्व सोडले आहे. आकडेवारीनुसार, 7046 लोकांनी सिंगापूरचे, 3754 लोकांनी स्वीडनचे, 170 लोकांनी बहरीनचे, 2 जणांनी अंगोलचे, 21 जणांनी इराणचे, 1 जणांनी इराकचे नागरिकत्व घेतले आहे. याशिवाय 1400 हून अधिक लोकांनी चीनचे नागरिकत्वही घेतले आहे. त्याच वेळी, असे 48 लोक आहेत ज्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतले आहे. (people who have taken citizenship of Pakistan)
7th Pay Commission: पगार मिळणार छप्पर फाड के..! पहा किती असणार मिनीमम सॅलरी https://t.co/Hb2HdXGvGB
— Krushirang (@krushirang) July 19, 2022