Indian Airforce : जर तुम्ही देखील भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सोडून संधी उपलब्ध झाली आहे.
भारतीय वायुसेनेने अग्निवीरवायू (म्यूजिशियन) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अविवाहित पुरुष आणि महिला अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना 5 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच प्रवेशपत्र देण्यात येणार आहे
ही भरती 3 जुलै ते 12 जुलै दरम्यान कानपूर आणि बेंगळुरूमध्ये आयोजित केली जाईल.
वय श्रेणी
2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007 दरम्यान जन्मलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. यासोबतच पिच आणि गायन, संगीत यामध्ये पारंगत असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा, कार्यक्षमता चाचणी, अनुकूलता चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कसा करावा
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पगार
उमेदवारांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये दरमहा, दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये प्रति महिना मिळतील.