Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘अग्निपथ योजने’वरून युद्ध: ‘या’ राज्यात पुन्हा गोंधळ; मोदी सरकार विरुद्ध आंदोलन तीव्र

नवी दिल्ली – लष्करात भरतीसाठी (Army Requirment) आणलेल्या अग्निपथ योजनेला ( Agneepath Yojana) बिहार (Bihar) आणि देशातील विविध राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी या योजनेला विरोध करत जेहानाबादमध्ये गोंधळ घातला. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर जाळपोळ करून पोलिसांवर दगडफेक करून निषेध नोंदवला. या निदर्शनात एसपीडीओ थोडक्यात बचावले. यासोबतच बिहारमधील आरा, बक्सर आणि नवादा येथेही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

Advertisement

बक्सरमध्ये, विद्यार्थ्यांनी दिल्ली-हावडा रेल्वे मार्ग रोखला आहे, जो देशातील सर्वात महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बक्सरमध्ये 100 हून अधिक तरुण रेल्वे ट्रॅकवर बसले आहेत. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या अनेक मुख्य गाड्यांवरही परिणाम झाला आहे.

Advertisement

आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या दीड वर्षांपासून आम्ही सैन्यात नोकरीच्या प्रतीक्षेत आहोत. आता अग्निपथच्या नावावर सरकारने 4 वर्षांसाठी नोकरभरतीची योजना आणली आहे, 4 वर्षांनी आम्ही काय करणार. यासह जुनी भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

कालही बिहार आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये या योजनेच्या विरोधात निदर्शने झाली. बुधवारी राजस्थानमधील विद्यार्थ्यांनी दिल्ली-अजमेर विमानतळ रोखून धरले. कर्धानीचे एसएचओ बनवारी लाल यांनी सांगितले की, दुपारी सुमारे 150-200 तरुणांनी अजमेर-दिल्ली एक्स्प्रेस हायवेवर अग्निपथ योजनेसह सैन्यातील प्रलंबित भरतीसाठी आंदोलन केले, सैन्य भरतीसाठी लेखी परीक्षा न घेण्याच्या मागणीसाठी. तरुणांच्या आंदोलनामुळे महामार्गावर पाच किलोमीटर लांब जाम झाला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply