नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी सलग 24 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol And Diesel Price) कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 21 मे रोजी सरकारने तेलावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठ आणि सहा रुपयांची घसरण झाली होती.
महागाईपासून दिलासा देण्यासाठी पावले उचलली
त्यावेळी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर काही राज्यांनीही व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला होता. वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोलचे दर आठ रुपयांनी तर डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी झाले आहेत.
विविध शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
– लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
– जयपूरमध्ये पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
– तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
–
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर होती, तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटरने विकले जात होते. तेव्हापासून आतापर्यंत अनेकवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 10 रुपयांची वाढ झाली होती.