Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी..! ‘त्या’ प्रकरणात सोनिया गांधींना पुन्हा समन्स; आता ED ने दिला ‘हा’ मोठा आदेश

नवी दिल्ली –  नॅशनल हेराल्ड (National herald) वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Advertisement

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ईडीने सोनिया गांधींना पुन्हा समन्स बजावले आहे. कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. यापूर्वी ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Advertisement

सोनियांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही 13 जून रोजी चौकशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस संचालित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे मालक यंग इंडियन कंपनीतील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीशी संबंधित हे प्रकरण आहे. या प्रकरणात, ईडीला मनी लाँडरिंग कायद्याच्या (PMLA) फौजदारी कलमांतर्गत सोनिया आणि राहुल गांधी यांचे जबाब नोंदवायचे आहेत. मात्र, या प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. 2012 मध्ये भाजप नेते आणि अधिवक्ता सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

Loading...
Advertisement

राहुल गांधींना यापूर्वी एजन्सीने 2 जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते, तर केरळच्या वायनाड मतदारसंघातील लोकसभा सदस्य राहुल गांधी यांनी देशाबाहेर असल्याने नवीन तारखेची मागणी केली होती. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ने मिळवलेल्या कथित बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी सुरू असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंग इंडियन आणि एजेएलच्या शेअरहोल्डिंग पॅटर्न, आर्थिक व्यवहार आणि प्रवर्तकांची भूमिका समजून घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणि गांधी कुटुंबाची चौकशी ही ईडीच्या चौकशीचा एक भाग आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक आणि भागधारक आहेत.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

दुसरीकडे, 13 जूनला राहुल गांधींच्या चौकशीच्या दिवशी काँग्रेस पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि संघटना प्रभारी के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी AICC सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत सर्व खासदार आणि CWC चे सदस्य ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, काँग्रेस भारतभरातील सर्व राज्यांमध्ये ईडी कार्यालयांसमोर ‘सत्याग्रह’ करण्याच्या तयारीत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply