Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नुपूर शर्माच्या अडचणीत वाढ ; आता ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून समन्स; दिला ‘हा’ मोठा आदेश

नवी दिल्ली –  भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर पोलीस कारवाई सुरू झाली आहे. मुंब्रा पोलिसांनी (Mumbra police) शर्मा यांना 22 जूनपर्यंत चौकशीसाठी बोलाविल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे शर्मा वादात सापडले आहेत. भाजपने त्यांना पक्षातून निलंबितही केले होते.

Advertisement

शर्मा यांना मुंब्रा पोलिसांनी 22 जूनपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुलचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यासह अनेक लोक शर्मा यांच्या अटकेची मागणी करत होते. याशिवाय इराण, इराकसह जवळपास 14 देशांनी भाजपच्या माजी नेत्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र, शर्मा यांनी आपले वक्तव्य मागे घेण्याची घोषणा केली होती.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

दिल्ली पोलिसांनी शर्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी भाजपचे माजी प्रवक्ते शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात एफआयआर नोंदवला होता. आपल्याला मिळत असलेल्या धमक्यांचा हवाला देत शर्मा यांनी पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती.

Advertisement

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “शर्मा यांनी आरोप केला होता की त्यांना धमक्या मिळत होत्या आणि त्यांच्या वक्तव्यासाठी त्रास दिला जात होता, त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply