दिल्ली – बिहारमध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी (MLC Election) पुन्हा एकदा महाआघाडीतील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रीय जनता दलाने (RJD) काँग्रेस (Congress) आणि डाव्यांना (Left) न विचारता तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले. त्यामुळे दुखावलेल्या काँग्रेसने डाव्यांच्या पाठिंब्याने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत तेजस्वी यादवही दबाव वाढवण्यासाठी ‘ओवेसी डाव’ चालवण्याचा विचार करत आहेत.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
राजकीय जाणकारांच्या मते राजदची एआयएमआयएमशी जवळीक वाढत असून काँग्रेस आणि डाव्यांना संदेश देणे हे त्यामागचे मुख्य कारण आहे. त्यांनी आपले मत बदलले नाही तर आरजेडी आपला जोडीदार बदलण्यास तयार आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न आहे. ओवेसींचा पक्ष अद्याप महाआघाडीचा भाग नाही. बिहारमध्ये AIMIM चे 5 आमदार आहेत.
आरजेडीकडे सध्या एकूण 76 आमदार आहेत. विधानपरिषदेची एक जागा जिंकण्यासाठी 31 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. अशा स्थितीत राजदचा 2 जागांवर विजय निश्चित आहे. मात्र तिसरी जागा जिंकण्यासाठी 17 मतांची कमतरता आहे. काँग्रेसकडे 19 तर डाव्यांकडे 12 आमदार आहेत. अशा स्थितीत युतीचे सहकारी एकत्र राहिले तर तिसऱ्या जागेवरही विजय निश्चित होता.
महाआघाडीत फूट पडल्याने आता तिसर्या जागेवर पेंच अडकला आहे. अशा स्थितीत राजद ओवेसींच्या पक्षाशी हातमिळवणी करण्यास तयार आहे. बुधवारी जात जनगणनेबाबत सर्वपक्षीय बैठकीपूर्वी तेजस्वी यादव यांनी विरोधी आमदारांची भेट घेतली.
यावेळी एआयएमआयएमचे आमदार अख्तरुल इमानही उपस्थित होते. राजदला विजय मिळवून देण्यासाठी ओवेसी यांच्या पक्षाकडे पुरेसे आमदार नसले तरी डावे आणि काँग्रेसचे काही आमदार क्रॉस व्होटिंग करू शकतात, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.