Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देशात ‘या’ राज्यात बेरोजगारीचा दर सर्वात कमी; जाणुन घ्या महाराष्ट्राची परिस्थिती काय

दिल्ली –   सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात छत्तीसगड (chattisgarh) हे देशातील सर्वात कमी बेरोजगारी दर असलेले राज्य होते. CMIE च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात राष्ट्रीय बेरोजगारीचा दर 7.1% होता, तर याच कालावधीत छत्तीसगडमध्ये बेरोजगारीचा दर फक्त 0.7% होता. सोप्या भाषेत, याचा अर्थ असा की मे महिन्यात, प्रत्येक 100 लोकांपैकी 0.7 लोक म्हणजे एकापेक्षा कमी लोक बेरोजगार होते.

Advertisement

मार्च आणि एप्रिल महिन्यातही छत्तीसगडचा बेरोजगारीचा दर 0.6 टक्के होता. मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी ट्विटरवर जाहीर केलेली आकडेवारी शेअर करून राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

CMIE च्या आकडेवारीवर, राज्य अधिकारी म्हणतात की कमी बेरोजगारीचा दर म्हणजे सरकारच्या योजना प्रभावी ठरत आहेत. अधिकाऱ्यांनी राजीव गांधी किसान न्याय योजना, गोधन न्याय योजना, सुराजी गाव योजना, नरवा-गरुवा-घुरवा-बारी कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण भूमिहीन किसान न्याय योजना या योजनांचे श्रेय दिले.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

CMIE ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील बेरोजगारीचा दर कमी असलेल्या राज्यांमध्ये छत्तीसगड 0.7% सह पहिल्या क्रमांकावर आहे, तर मध्य प्रदेश 1.6% सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ कमी बेरोजगारी असलेली राज्ये गुजरात 2.1%, ओडिशा 2.6%, उत्तराखंड 2.9%, तामिळनाडू 3.1%, उत्तर प्रदेश 3.1%, महाराष्ट्र 4.1%, मेघालय 4.1%, कर्नाटक 4.3%, आंध्र प्रदेश 4.4%, पुद्दुचेरी, 5.6%

Advertisement

CMIE च्या या आकडेवारीनुसार, हरियाणामध्ये देशातील सर्वाधिक 24.6% बेरोजगारी दर आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये 22.2%, जम्मू-काश्मीरमध्ये 18.3%, त्रिपुरामध्ये 17.4%, दिल्लीत 13.6%, गोव्यात 13.4%, बिहारमध्ये 13.3%, झारखंडमध्ये 13.1%, हिमाचल प्रदेशात 9.6%, तेलंगणा, 9.4% पंजाबमध्ये बेरोजगारीचा दर 9.2%, आसाममध्ये 8.2% आणि सिक्कीममध्ये 7.5% आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply