Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ राज्यात 6 समुदायांना मिळणार अल्पसंख्याक प्रमाणपत्र

दिल्ली – आसाम सरकारने (Assam Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात धर्माच्या आधारावर 6 समुदायांना अल्पसंख्याक दर्जा दिला जाणार आहे. आसाम मंत्रिमंडळाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी धर्मीय समुदायातील लोकांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. गुवाहाटी येथे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Hemant Biswa Sarma) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

राज्य सरकारमधील मंत्री केशब महंता म्हणाले, “आसाम मंत्रिमंडळाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी या सहा धार्मिक अल्पसंख्याक समुदायातील लोकांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Advertisement

विशेषत: मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या वर्षी एप्रिलमध्ये आसाममधील अल्पसंख्याक दर्जा पुन्हा परिभाषित करण्याबाबत बोलले होते. सीएम हिमंता बिस्वा सरमा म्हणाले होते की, ‘ज्यांना वाटते की भारतात फक्त मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. ते पश्चिमेकडील दक्षिण सलमारा-मानकाचर सारख्या आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य आहेत, जेथे मुस्लिम लोकसंख्येच्या सुमारे 95% आहेत.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी धार्मिक अल्पसंख्याकांच्या विभाजनाबद्दल जवळून बोलले होते. ते म्हणाले होते, “आज मुस्लिम समाजातील लोक विरोधी पक्षात नेते आहेत, ते आमदार आहेत. त्यांना समान संधी आणि सत्ताही आहे. अशा परिस्थितीत आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

Advertisement

सरमा पुढे म्हणाले होते की “सत्ता ही जबाबदारीसोबत येते. आसामच्या लोकसंख्येच्या 35 टक्के मुस्लिम असल्याने, येथील अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे!”

Advertisement
Advertisement

Leave a Reply