Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

PM मोदी करणार देशाला संबोधित; ‘या’ मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा; जाणुन घ्या डिटेल्स

दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज ‘मन की बात’ (Mann ki baat) रेडिओ कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. आज मन की बातची 89 वी आवृत्ती आहे. पंतप्रधान मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात करतात.

Advertisement

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी विविध विषयांवर लोकांशी बोलतात. पंतप्रधान म्हणाले की, मन की बात कार्यक्रमाच्या या आवृत्तीसाठी त्यांना अनेक सूचना मिळाल्या आहेत. मोठ्या संख्येने तरुणांनी आपले विचार मांडल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना, हवामान बदल, वायू प्रदूषण इत्यादी विषयांवर चर्चा करू शकतात.

Advertisement

या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते
या कार्यक्रमासाठी लोक त्यांचे विचार आणि सूचना देखील शेअर करू शकतात. त्यापैकी काही निवडक कल्पना आणि सूचना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यक्रमात समाविष्ट केल्या आहेत. मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान देशवासियांना बुलंद भारताच्या उदात्त चित्राची जाणीव करून देतील, असे मानले जात आहे. याशिवाय, पंतप्रधान कोरोना, हवामान बदल, वायू प्रदूषण इत्यादी विषयांवर बोलू शकतात.

Advertisement

अमरोहाचे ढोलक व्यापारी चर्चा करणार

Loading...
Advertisement

आज पीएम मोदींसोबत मन की बात कार्यक्रमात तुम्ही अमरोहाच्या ढोलकी वादकांशी संवाद साधू शकता. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. कार्यक्रमाच्या टेलिकास्टमध्ये वुड हॅन्डीक्राफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष शक्ती कुमार अग्रवाल यांच्याशी चर्चा होईल. थेट प्रक्षेपणासाठी दिल्लीची तांत्रिक टीम अमरोहा येथे पोहोचली आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मन की बात ऐकणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज गुरुग्राममधील सेक्टर 27 मध्ये असलेल्या कम्युनिटी सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम ऐकणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी मोठ्या संख्येने तरुण आणि भाजप कार्यकर्त्यांना मन की बात ऐकण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply