Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आर्मीने घेतला ‘त्या’ टीव्ही कलाकारच्या मृत्यूचा बदला; 3 दिवसांत इतक्या दहशतवादी ठार ..

दिल्ली – काश्मीरमध्ये (Kashmir) टीव्ही अभिनेत्री (TV Actress) अमरीन भटच्या(Amrin Bhat) मृत्यूचा बदला सुरक्षा दलांनी (Indian army) घेतला आहे. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. स्वतः आयजीपी काश्मीर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘टीव्ही अभिनेता अमरीन भटच्या निर्घृण हत्येचा 24 तासांत उकल झाला. काश्मीर खोऱ्यात तीन दिवसांत जैश-ए-मोहम्मदच्या 3 आणि लष्कर-ए-तैयबाच्या 7 जणांसह 10 दहशतवादी ठार करण्यात आले आहे.

Advertisement

गुरुवारी, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते, ज्यांनी बुधवारी एका महिला टीव्ही कलाकाराची हत्या केली होती. पोलीस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार यांनी ट्विट केले होते की, “दिवंगत कलाकार अमरीन भट (एलईटीचे दहशतवादी) यांचे दोन्ही मारेकरी अवंतीपोरा चकमकीत पकडले गेले आहेत. पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.”

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

मरीन भट या टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टारची बुधवारी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि तिचा 10 वर्षांचा पुतण्या या हल्ल्यात जखमी झाला. यापूर्वी, पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील अगन हांजीपुरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply