Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय; ‘या’ दिवशी होणार ‘त्या’ जागांसाठी पोटनिवडणूक

दिल्ली –  निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्ये आणि दिल्लीतील लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा (Assembly) पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या राज्यांमध्ये लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड आणि दिल्लीचा समावेश आहे. या जागांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून 26 रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Advertisement

निवडणूक आयोगाने त्रिपुरातील आगरतळा आणि टाउन बोर्डोवल, सूरमा सुरक्षित, जुबराजनगर विधानसभा जागा, आंध्र प्रदेशातील आत्मकूर, दिल्लीतील राजेंद्र नगर, झारखंडमधील मंदार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. पंजाबमधील संगरूर लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर या जागांवर लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

दोन मुख्यमंत्र्यांमुळे निवडणूक चर्चेत
भगवंत मान हे संगरूर (पंजाबमधील निवडणूक) लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते, त्यांनी राजीनामा दिला होता आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भगवंत मान 2014 मध्ये ही जागा जिंकून 2019 मध्ये पुन्हा खासदार झाले. आम आदमी पक्षाचे ते लोकसभेतील एकमेव खासदार होते. आझमगडमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव खासदार होते. त्यांनी करहाल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. याशिवाय आझम खान हे रामपूर मतदारसंघातून खासदार होते. त्यांनी रामपूर विधानसभेची जागा जिंकली. यानंतर त्यांनी आपापल्या लोकसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता.

Advertisement

आझमगडमध्ये तयारी सुरू
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आझमगड सदर लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या घोषणेने जिल्हा निवडणूक कार्यालयात निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीत आझमगड लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा जागा आझमगड, गोपालपूर, सागडी, मुबारकपूर आणि राखीव जागा मेहनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 23 जून रोजी मतदान होणार असून, 26 जून रोजी मतमोजणी होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिलकुमार मिश्रा यांनी सांगितले. अधिसूचना जारी झाल्यापासून ते नामांकनाच्या तारखेपर्यंत संभाव्य उमेदवारांना फॉर्म भरता येणार असल्याचे सांगितले. या लोकसभेच्या पाच विधानसभा मतदारसंघातील 1149 मतदान केंद्रांच्या 2176 बूथवर निवडणूक होणार असून, या ठिकाणी एकूण 18,38,593 मतदार मतदान करू शकतील.

Advertisement

राघव चड्डी यांची दिल्लीत जागा रिक्त
त्रिपुरात विधानसभेच्या चार जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.आंध्र प्रदेशात एका विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. वायएसआर काँग्रेसच्या नेत्याचे 22 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्याचवेळी दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राघव चड्डा येथून आमदार होते, ते आता राज्यसभेत पोहोचले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply