दिल्ली- त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांनी शनिवारी सांगितले की, त्यांनी राज्यपाल एसएन आर्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर देब यांनी ही घोषणा केली.(Big news! Chief Minister resigns; Many discussions abound)
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आगरतळा येथे पोहोचले आहेत.
भाजप आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करू शकते. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला याबाबात राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.( Big news! Chief Minister resigns; Many discussions abound)