Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अखेर ‘त्या’ प्रकरणात IAS पूजा सिंघलला ईडीने दिला धक्का; केली मोठी कारवाई

दिल्ली –  झारखंडमध्ये (Jharkhand) तैनात असलेल्या IAS पूजा सिंघल (Pooja Singhal)  यांना ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंग (money laundering) प्रकरणात अटक केली आहे. पूजा सिंघल या झारखंडच्या खाण सचिव आहेत. खुंटी येथील मनरेगाच्या पैशाच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात ती मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाली होती.

Advertisement

ईडीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. 2000 बॅचचे आयएएस अधिकारी सिंघल यांना ईडीने अनेक प्रश्न विचारले होते. 6 मे रोजी, ईडीने झारखंडसह इतर काही ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सिंघल आणि त्यांचे व्यावसायिक पती अभिषेक झा यांची हलकी चौकशी केली होती.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

दरम्यान, पूजाचा पती अभिषेक याची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. पती-पत्नी, दोघांची आज समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली.

Advertisement

अंमलबजावणी संचालनालयानेही अभिषेकच्या पल्स हॉस्पिटलवर छापा टाकला होता.पल्स हॉस्पिटलमध्ये गुंतवणूक कुठून आली असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला. त्यांच्या पत्नी पूजा सिंघल यांचाही या रुग्णालयाच्या उभारणीत हातभार आहे का? अभिषेक झा यांना विचारले जात आहे की, हॉस्पिटलमध्ये 123 कोटींहून अधिक गुंतवणूक झाली असताना, कर्ज केवळ 23 कोटीच कसे दाखवले? बाकीचे पैसे आले कुठून? पूजा सिंघलचीही यात काही भूमिका आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत ईडीला मिळू शकलेली नाहीत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply