Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ प्रकरणात पोलिसांना न्यायालयाची फटकार; विचारले,परवानगीशिवाय ..

दिल्ली – जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करताना दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने शनिवारी आठ जणांचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपींना जामिनावर सोडल्याने साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो, असे रोहिणी कोर्टाचे म्हणणे आहे. आरोपी हे परिसरातील सुप्रसिद्ध गुन्हेगार आहेत त्यामुळे कोणीही साक्षीदार पुढे येणार नाही. जामीन अर्ज फेटाळण्यासोबतच बेकायदेशीर मिरवणूक न थांबवल्याबद्दलही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना विचारले की, “तिथे परवानगी नसतानाही मिरवणूक कशी निघाली?” 

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पोलिसांचे पूर्ण अपयश असल्याचे सिद्ध

Advertisement

न्यायालयाने म्हटले की, प्रथमदर्शनी हे दिल्ली पोलिसांचे अपयश दर्शवते. परवानगीशिवाय काढण्यात आलेल्या मिरवणुकीला रोखण्यात स्थानिक पोलिसांना पूर्ण अपयश आल्याचे सिद्ध झाले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. न्यायालयाने पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे.

Loading...
Advertisement

न्यायालयाने अधिकाऱ्यांना निर्देश दिले
न्यायालयाने म्हटले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मुद्द्याला बगल दिल्याचे दिसते. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये आणि अवैध धंदे रोखण्यात पोलिस कमी पडू नयेत.

Advertisement

हिंसाचारातील मुख्य आरोपीला अटक

Advertisement

दिल्लीच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी जहांगीरपुरी येथे उसळलेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी तबरेजला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचारानंतर आरोपी परिसरात पोलिस अधिकाऱ्यांच्या टीममध्ये मोकळेपणाने फिरत होते. पोलिसही याबाबत अनभिज्ञ होते. मात्र या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर आता तो पकडला गेला आहे. जहांगीरपुरी येथील शोभा यात्रेवर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने वरील कारवाई केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply