Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

यूपीच्या राजकारणात येणार भूकंप; ‘त्या’ प्रकरणात आझम खानबाबत होणार मोठा निर्णय

दिल्ली – सपा (Samajwadi party) नेते आझम खान (Azam Khan) तुरुंगातून बाहेर येणार की आता तिथेच राहणार, याबाबतची सस्पेंस गुरुवारीही कायम राहिली. गुरुवारीही त्यांच्या जामिनावर निर्णय होऊ शकला नाही. शत्रू मालमत्ता प्रकरणात त्याच्या जामीनाबाबत उच्च न्यायालयात तीन तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. दुपारी 3.50 ते 6.42 वाजेपर्यंत चाललेला युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांच्या न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

आझमवर एकूण 72 गुन्ह्यांपैकी 71 गुन्ह्यांमध्ये त्याला जामीन मिळाला आहे. आता केवळ शत्रू मालमत्तेच्या प्रकरणात जामीन मिळणे बाकी आहे. त्याच्या बाजूने निकाल लागला तर तो तुरुंगातून बाहेर येईल. आझमविरुद्ध हा गुन्हा 2019 मध्ये अझीमनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. आझमवर शत्रूची मालमत्ता हस्तगत करून जौहर विद्यापीठात विलीन केल्याचा आरोप आहे.

Loading...
Advertisement

शत्रूच्या मालमत्तेवर कब्जा केल्याच्या आरोपांशी संबंधित या प्रकरणाची सुनावणी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पूर्ण झाली होती. न्यायालयानेही निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी काही नवीन तथ्ये मांडण्यासाठी यूपी सरकारने न्यायालयाकडे वेळ मागितला होता. गुरुवारी आझम यांच्या वकिलांच्या वतीने वैयक्तिक स्वार्थासाठी जमीन ताब्यात घेण्यात आली नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

Advertisement

29 एप्रिल रोजी यूपी सरकारने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यांना आझम यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र ईदमुळे 2 मे ही सुटीही असल्याने सरन्यायाधीशांच्या आदेशामुळे 2 मे रोजीच्या खटल्यांची सुनावणी बुधवारी झाली. यानंतर 4 आणि 5 मे रोजी गुरुवारी सुनावणी झाली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply