Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर; ‘या’ राज्यात होणार महागाई भत्त्यात वाढ

दिल्ली –  गुजरातच्या (Gujarat) स्थापना दिनानिमित्त राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना बंपर भेट दिली आहे. याअंतर्गत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गुजरात राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01 जुलै 2021 पासून वाढीव DA चा लाभ मिळेल. हा लाभ 7व्या वेतन आयोगांतर्गत उपलब्ध आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये या श्रेणीतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांची संख्या 9.38 लाख आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

थकबाकी दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल
सर्व कर्मचाऱ्यांची मागील 10 महिन्यांची थकबाकी दोन समान हप्त्यांमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली. पहिल्या पाच महिन्यांच्या थकबाकीचा पहिला हप्ता मे 2022 च्या पगार आणि पेन्शनमध्ये जोडला जाईल. त्यानंतरच्या पाच महिन्यांच्या थकबाकीचा दुसरा हप्ता जून 2022 च्या पगारासह दिला जाईल. अशाप्रकारे मे महिन्यापासून लाभार्थी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे.

Loading...
Advertisement

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या गुजरात दिनाच्या शुभेच्छा
गुजरातच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले की, गुजरात दिनानिमित्त राज्यातील सर्व रहिवाशांना शुभेच्छा. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी विकासाच्या मापदंडावर देशातील आघाडीच्या राज्यांमध्ये आहे. इथल्या पुरोगामी लोकांनी आणि उद्योजकांनी गुजरात आणि भारताची जगभरात खास ओळख निर्माण केली आहे. राज्याची अशीच प्रगती व्हावी हीच सदिच्छा.

Advertisement

अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुजरातच्या स्थापना दिनानिमित्त गुजरातच्या जनतेला माझ्या शुभेच्छा. महात्मा गांधी, सरदार पटेल आणि इतर अनेक महान लोकांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, गुजरातमधील लोक त्यांच्या वैविध्यपूर्ण कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक करतात. येत्या काही वर्षांत गुजरातची प्रगती होवो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply