केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये: ‘त्या’ प्रकरणात घेतला मोठा निर्णय; नागरीकांना मिळणार दिलासा
दिल्ली – कोळशाचे (Coal) रेक औष्णिक वीज केंद्रापर्यंत लवकर पोहोचावेत आणि वीज संकट संपले म्हणून मोदी सरकारने (Modi government) 657 पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या आहेत. विजेची सर्वाधिक मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे देशात निर्माण झालेल्या वीज संकटावर मात करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेमध्ये वीज संकटाचा सामना नागरिक करत आहेत.
वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले आहे की देशभरातील औष्णिक वीज केंद्रांना कोळसा त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, पॅसेंजर गाड्या रद्द केल्यामुळे, कोळशाने भरलेल्या रेक असलेल्या मालगाड्यांना झटपट मार्ग मिळेल आणि त्या औष्णिक वीज केंद्रापर्यंतचे अंतर कमी वेळेत पूर्ण करू शकतील.
कोळशाच्या तुटवड्यामुळे अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. या उन्हाळ्यात वीज खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
देशाचे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सध्या परिस्थिती स्थिर आहे. आपल्याकडे सुमारे 3 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे, तर औष्णिक ऊर्जा प्रकल्पात 21 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. त्यांनी सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धामुळे गॅसचा पुरवठा बंद झाला आहे. अशा परिस्थितीत कडाक्याच्या उन्हात मागणी वाढली आहे. मात्र, दैनंदिन 2.5 अब्ज युनिट्सचा वापर लक्षात घेता, सध्या सुमारे 3.5 अब्ज युनिट वीजनिर्मिती होत आहे. येथे NTPC ने असेही म्हटले आहे की दादरीचे सर्व 6 युनिट आणि उंचाहरचे 5 युनिट पूर्ण क्षमतेने चालू आहेत. कोळशाचा पुरवठाही सातत्याने होत आहे.