Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींचा ‘तो’ दावा ठरला खरा; सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण

दिल्ली – प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या काँग्रेसमध्ये (Congress) न येण्याच्या निर्णयानंतर आता अनेक गोष्टी समोर येत आहेत.  काँग्रेसच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहिल्याच दिवशी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येणार नसल्याचे सांगितले होते. त्याचवेळी निवडणूक रणनीतीकार पीके यांना काँग्रेसचा वापर करून इतर पक्षांचा फायदा घ्यायचा होता, असे अनेक पक्षांच्या नेत्यांना वाटत होते. तर प्रशांत किशोर यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी आणि त्यांच्यातील शंका-कुशंका दूर होऊ शकल्या नाहीत.

Advertisement

प्रशांत किशोर यांना पक्षाने अधिकार देऊन काँग्रेस कमिटीमध्ये निवडणूक व्यवस्थापनाची कार्यात्मक जबाबदारी देऊ केली होती, परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, प्रशांत किशोर यांना एकतर काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव व्हायचे होते किंवा उपाध्यक्ष व्हायचे होते.

Advertisement

काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी पहिल्याच दिवशी प्रशांत किशोर पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते. पीके आणि काँग्रेस यांच्यात आठव्यांदा चर्चा झाली होती. राहुल गांधी आधीपासूनच पीकेबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसत होता आणि ते याच काळात परदेशात गेले. त्यामुळे आता राहूल गांधी यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याशी संवाद साधला.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

त्याचवेळी काँग्रेस पक्षातील सुधारणांबाबत प्रशांत किशोर ज्या सूचना आणि योजना देत आहेत, त्या कायमस्वरूपी नाहीत, असे अनेक काँग्रेस नेत्यांना वाटले. पीके यांना फक्त काँग्रेसचा व्यासपीठ वापरायचा होता. दुसरीकडे, काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की प्रशांत किशोर यांच्याकडे केवळ निवडणुकीचे आकडे आहेत जे निश्चितपणे प्रभावी आहेत परंतु त्यांच्याकडे पक्ष नेतृत्वाबाबत कोणतीही योजना नाही.

Advertisement

या सगळ्या घडामोडींमध्ये राहुल गांधी परदेशात गेल्यावर काँग्रेस प्रशांत किशोर यांना पक्षात कोणतेही मोठे पद देऊ इच्छित नाही, ही भीती अधिकच गडद झाली होती. त्यामुळे त्यांना निवडणुकीशी संबंधित एका मोठ्या जबाबदारीची ऑफर देण्यात आली होती, जी पीकेने नाकारली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply