Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

..म्हणूनच प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाही; झाला धक्कादायक खुलासा

दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करण्याचा पक्ष नेतृत्वाचा प्रस्ताव धुडकावून लावला. ते म्हणाले की, देशातील सर्वात जुन्या पक्षात रुजलेल्या संरचनात्मक समस्यांवर मात करण्यासाठी काँग्रेसकडे नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्ती असली पाहिजे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी किशोर यांना काँग्रेसच्या ‘प्रिव्हिलेज्ड वर्किंग ग्रुप-2024’ चा भाग बनून पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांना यापेक्षा जास्त पाहिजे होता त्यामुळेच त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नाही.

Advertisement

प्रशांत किशोर यांना बिहारबद्दल महत्त्वाकांक्षा

Advertisement

सूत्रांनी सांगितले की, प्रशांत किशोर यांना काँग्रेसचे सरचिटणीस (नियोजन आणि रणनीती) व्हायचे होते आणि त्याचवेळी त्यांना अशी यंत्रणा हवी होती ज्यामध्ये ते केवळ काँग्रेस अध्यक्षांना अहवाल देतील, तर काँग्रेसने त्यांना ‘प्रिव्हिलेज्ड वर्किंग ग्रुप’चे सदस्य बनवत होते.

Loading...
Advertisement

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांचीही बिहारबद्दल महत्त्वाकांक्षा होती आणि पक्षाने त्यांना पुढील वर्षी बिहार काँग्रेसचे अध्यक्ष बनवावे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करावे अशी त्यांची इच्छा होती.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पीकेच्या विश्वासार्हतेबद्दलही शंका व्यक्त केल्या जात होत्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील विश्वासार्हतेबद्दल अनेकांच्या मनात भीती होती, कारण ते इतर अनेक राजकीय पक्षांशीही जवळचे होते. तेलंगणा प्रभारींनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते की, जो शत्रूच्या जवळ आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये. खरे तर त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे प्रशांत किशोर यांची कंपनीसोबत काम करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाण्याच्या शक्यतेवरून पक्षात सतत मंथन सुरू होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply