Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रशांत किशोर करणार काँग्रेसमध्ये प्रवेश; होणार मोठा निर्णय; ‘त्या’ अहवालाकडे सर्वांचे लक्ष

दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार की नाही, याचा निर्णय आज होणार आहे. खरे तर त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत काँग्रेसने समिती स्थापन केली होती. आज या समितीने आपला अहवाल अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सादर केला आहे. आज 10 जनपथवर म्हणजेच सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी या मुद्द्यावर बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी किशोर यांनी दीर्घ सादरीकरण केले आहे.

Advertisement

वृत्तसंस्था एएनआयने दावा केला आहे की समिती सदस्य केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि प्रियांका गांधी वड्रा सध्या 10 जनपथवर उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींसोबत अनेक भेटी घेतल्या आहेत.

Advertisement

किशोर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत नेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. भाजप, जेडीयू, टीएमसी आणि काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने काही वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. बहुतेकांनी पाठिंबा दिला असला तरी अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षांवर सोडला आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

दिग्विजय सिंह यांचा किशोरला पाठिंबा
दिग्विजय सिंह यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनी किशोर यांनी ठोस धोरणात्मक योजना आणली असून समितीने त्यावर अधिक चर्चा केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पक्षाला मदत होईल, असे ते म्हणाले. सूत्रांनी सांगितले की किशोर यांनी यापूर्वी काँग्रेसमधील काही जी-23 नेत्यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी शरद पवारांसह काही विरोधी नेत्यांचीही भेट घेतली होती. नरेंद्र मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधकांनी एकजुटीने निवडणूक लढवावी, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. त्यासाठी पक्षाची धुरा गांधीविरहित व्यक्तीकडे सोपवून काँग्रेसला मजबूत करावे लागेल, असे ते म्हणाले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply