दिल्ली – देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण (Corona patients) वाढत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी (PM Modi) सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, गृहमंत्री अमित शाह आणि इतर मंत्रालयांचे अधिकारी या बैठकीत सहभागी होतील.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण साथीच्या परिस्थितीबाबत सादरीकरण करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लसीकरणाची स्थिती आणि बूस्टर डोसची माहितीही ते देणार. गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत आणि त्यामुळे चौथ्या लाटेची भीती सतावू लागली आहे. रविवारी कोरोनाचे 2593 नवीन रुग्ण आढळले. हा सलग दुसरा दिवस आहे जेव्हा कोविडचे 2500 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
देशात आतापर्यंत 4,30,57,545 प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 5,22,193 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या 15873 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडूसह अनेक राज्यांनी मास्क घालणे अनिवार्य केले आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
1 एप्रिलपासून देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा हटवण्यात आला आहे. यानंतर अनेक सवलती देण्यात येणार होत्या, मात्र त्यानंतर उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी पुन्हा निर्बंध लादण्यास सुरुवात केली. कर्नाटक सरकारने अद्याप सूट देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाची प्रकरणे हाताळण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.