Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

प्रशांत किशोर काँग्रेसच्या अटींवर सरेंडर? अनेक चर्चांना उधाण; जाणुन घ्या संपुर्ण डिटेल्स

दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार असल्याच्या अटकेदरम्यान ते शनिवारी हैदराबादला पोहोचल्याचे वृत्त आहे. यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K.C. R) यांच्याशी दीर्घ भेट घेतल्याचे बोलले जात आहे. काही काळापूर्वी केसीआर आणि किशोर यांची अनेकदा भेट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. विशेष म्हणजे केसीआर हे भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधकांना एकत्र करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

किशोर यांनी इतर राजकीय पक्षांपासून दूर राहावे, अशी काँग्रेसच्या विशेष टीमची इच्छा आहे. याआधी पीकेने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेससह अनेक पक्षांसोबत काम केले आहे.

Loading...
Advertisement

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, किशोर शनिवारी सकाळी 9.30 वाजता दिल्लीहून हैदराबादला पोहोचले होते. तेथे त्यांनी केसीआर आणि टीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांच्याशी पुढील निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. किशोर रविवारी प्रगती भवनात मुक्काम करणार असून आज रविवारीही चर्चेची फेरी सुरू ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement

विशेष म्हणजे या बैठकीसाठी टीआरएस सुप्रिमोने इतर कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिले नव्हते. निवडणूक रणनीतीकार रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी रात्री दिल्लीला रवाना होऊ शकतात.

Advertisement

किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित!
नुकतीच बातमी आली होती की, किशोर काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता प्रबळ दिसत आहे. येथे, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या समितीने किशोर यांनी सुचवलेल्या योजनेबाबत शुक्रवारी अहवाल सादर केला होता. समितीचे सदस्य केसी वेणुगोपाल आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी अहवाल सादर केला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply