Take a fresh look at your lifestyle.

एका वर्षातील आठ कसोटी सामन्यात ५२ बळी घेणाऱ्या अश्विनला मिळाले `हे` नामांकन

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा अष्टपैलू काइल जेमिसन आणि श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांना 2021 चा सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटूसाठी नामांकित केले आहे. यांच्यातूनच सर्वोत्तम खेळाडू ठरेल.

Advertisement

अश्विनने आपल्या धोकादायक फिरकीने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना हैराण केले आहे. या कालावधीत त्याने आठ कसोटीत १६.२३ च्या सरासरीने ५२ बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने 28.08 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत. त्याला जो रूट आणि काइल जेमिसन यांच्याकडून कडवी टक्कर द्यावी लागणार आहे. रूट आणि जेमिसन हेही यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.

Advertisement

रुट या वर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने यावर्षी 15 कसोटी सामन्यांमध्ये 1708 धावा केल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात 1700 हून अधिक धावा करणारा तो कसोटी इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू आहे यावरून रूटच्या फॉर्मचा अंदाज लावता येतो. यापूर्वी पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ आणि वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनी ही कामगिरी केली आहे.

Advertisement

न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू जेमिसनने यावर्षी पाच सामन्यांत १७.५१ च्या सरासरीने २७ बळी घेतले आहेत. या सहा फूट उंच गोलंदाजामुळेच किवी संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकता आली. अंतिम फेरीत त्याने पहिल्या डावात सात विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावरील पहिल्या कसोटीतही पाच विकेट्स घेतल्या होत्या.

Advertisement

याशिवाय श्रीलंकेच्या करुणारत्नेने सात सामन्यांत ६९.३८ च्या सरासरीने ९०२ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. करुणारत्नेने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यावर्षीचे सर्वोत्तम शतक झळकावले. याशिवाय बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यात त्याने दोन शतके झळकावली. त्यातील एक द्विशतक होते. याशिवाय करुणारत्नेनेही गालेमध्ये शतक झळकावले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply