Take a fresh look at your lifestyle.

टी-20 विश्वचषक : 9 वर्षांत भारतीय क्रिकेट संघासोबत प्रथमच घडले असे.. ते जाणून व्हाल थक्क..

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आली नाही. 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमधून टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणाऱ्या विराटला यावेळी ट्रॉफी जिंकण्याची शेवटची संधी होती. मात्र तीही त्याच्या हातून निसटली. रन मशिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाखाली अनेक यश संपादन केले. मात्र विश्वचषक जिंकण्याचे त्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले.

Advertisement

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि तीन आयसीसीच्या स्पर्धा विजेता माजी कर्णधार महेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन असूनही विराट आणि त्याच्या संघाने निराशा केली. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सेमी फायनलमध्ये सुद्धा पोहचला नाही.

Advertisement

स्पर्धेतील सर्वात सोपा मानल्या जाणाऱ्या `ब` गटातही भारताला योग्य कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाला आता नामिबियाविरुद्ध एकच औपचारिक सामना खेळायचा आहे. संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

Advertisement

9 वर्षांत प्रथमच आयसीसी स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये (सेमी फायनल) पोहोचू शकला नाही. 2012 नंतर पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघ आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला आहे. 2012 मध्ये श्रीलंकेत झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता आणि यावेळीही त्यांना गट सामन्यातच हार पत्करावी लागली.

Advertisement

भारतीय संघाने 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये उपविजेता ठरला.  भारतीय संघाने  2015 आणि 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. भारतीय संघ 2014 मध्ये पुन्हा T20 विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला आणि 2016 मध्ये उपांत्य फेरी गाठली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply