Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ नेत्यांच्या मुर्खपणामुळेच मोदी पंतप्रधान..ओवेसींची जहरी टिका..वाचा काय आहे कारण..

2019 मध्ये सुलतानपुरमधून भाजपा विजयी झाला. मात्र तेव्हा ओवेसी निवडणूक लढला नव्हता. मग सुलतानपुरमध्ये भाजपाला यश कसं मिळालं? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला.

दिल्ली: 2014 साली सत्तापालट होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यात हिंदु- मुस्लिम मतांच मोठ्या प्रमाणावर विभागणी होऊन मोदींनी बहुमताने सत्ता हस्तगत केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास दोन नेत्यांचे मुर्खपण कारणीभुत असल्याची जहरी टिका उत्तरप्रदेशमध्ये नुकतीच करण्यात आली आहे.

Advertisement

उत्तरप्रदेशच्या निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भाजप हिंदु मतांच्या ध्रुवीकरणासाठी प्रयत्न करत आहे.  मायावती दलित मतांवर डोळा ठेवून आहेत. अखिलेश यादव मुस्लिम आणि दलित मतांवर राजकारण करत आहेत. मात्र 2014 पासून देशात सर्वांचं लक्ष लागून असलेल्या एएमआयएम मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे.

Advertisement

उत्तरप्रदेशच्या या रणांगणावर सध्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. त्यात काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि एएमआयएमने भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. तर भाजपाकडून या सगळ्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Loading...
Advertisement

ओवेसी यांनी उत्तरप्रदेश निवडणूकीच्या प्रचारसभेत म्हटले की, 2019 मध्ये सुलतानपुरमधून भाजपा विजयी झाला. मात्र तेव्हा ओवेसी निवडणूक लढला नव्हता. मग सुलतानपुरमध्ये भाजपाला यश कसं मिळालं? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. तर आखिलेश यादव म्हणाले होते की, मुसलमान मतदारांनी समाजवादी पक्षाला मतदान केलं नाही. त्यावर ओवेसी यांनी जोरदार टिका करत म्हटले की, मुसलमान मतदार काय तुमचे कैदी आहेत का?

Advertisement

तर ओवेसी यांनी पुढे बोलताना म्हटले की, मायावती आणि अखिलेश यादव या दोन मुर्ख नेत्यांमुळे मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले. तसेच ओवेसी यांनी उत्तरप्रदेश विधानसभेच्या 100 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. कारण उत्तरप्रदेशात अल्पसंख्यांकासाठी 116 कोटी रूपयांची तरतूद होती. मात्र योगी सरकारने फक्त 10 कोटी रूपयेच खर्च केले, असा आरोप ओवेसी यांनी केला. तर मी संसदेत हा मुद्दा लावून धरला होता, मात्र तेव्हा अखिलेश शांत राहिले, असा आरोप ओवेसी यांनी केला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply