Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘यास’चा हाहाकार..! पश्चिम बंगालमध्ये 1 कोटी लोकांना फटका, महाराष्ट्रातही होणार हा परिणाम..!

नवी दिल्ली : ‘यास’ चक्रीवादळामुळे (Yaas cyclone) पश्चिम बंगालमध्ये हाहाकार उडाला आहे. तेथील तीन लाख घरांचे नुकसान झाले आहे. पश्चिम बंगाल (Pachim Bengal) व ओरिसामध्ये (Orisa) सुमारे 15 लाख लोक बेघर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्येच एक कोटी लोकांना या वादळाचा फटका बसल्याचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Advertisement

यास चक्रीवादळामुळे किनारी भागातील असंख्य झाडे, विजेचे खांब जमिनदोस्त झाले असून, वीज गुल झाल्याने हजारो गावे अंधारात बुडाले आहेत. लाखो नागरिकांचे वादळाआधीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. ओरिसामध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झारखंडमध्ये (Zarkhand) आज (गुरुवारी) हे चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे आधीच अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठे नुकसान झालेल्या दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर, उत्तर २४ परगणा या जिल्ह्यांची शुक्रवारी (ता.28) हवाई पाहणी करणार आहेत. चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील हवाई वाहतूक बुधवारी (ता.26) थांबविण्यात आली होती. भारतीय नौदल, तटरक्षक दल, एनडीआरएफने बचावकार्य सुरू केले आहे.

Advertisement

यास चक्रीवादळामुळे ओरिसातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील एका नदीत मंगळवारी (ता.25) रात्री बोट उलटली होती. या बोटीतील सर्व 10 प्रवाशांना वाचविण्यात यश आले. ओरिसामध्ये बुधवारी (ता.26) दोन जणांचा मृत्यू झाला. राज्यातील बालासोर जिल्ह्यातल्या अनेक गावात समुद्राचे पाणी शिरले होते.

Loading...
Advertisement

मुंबई विमानतळावरून भुवनेश्वर आणि कोलकात्याला जाणारी 6 विमाने रद्द करण्यात आली आहेत. भुवनेश्वर विमानतळ 25 ते 27 मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तर झारसुगुडा 26 ते 27 मेपर्यंत बंद ठेवण्यात आले. यास चक्रीवादळ आज (गुरुवारी) झारखंडमध्ये धडकणार आहे. त्यामुळे सिंगभूम येथील पूर्व व पश्चिम भागातील सुमारे सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

Advertisement

ओरिसातील धामरा बंदर ते बालासोर प्रदेशास ताशी १३५ ते १४५ किमी वेगाने यास चक्रीवादळ धडकले. त्यात उत्तर ओरिसातील किनारपट्टीवरील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ओरिसा व पश्चिम बंगालसह पाच राज्ये व अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशात नॅशनल डिझाॅस्टर रिस्पॉन्स फोर्सची (NDRF) 113 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ व अन्य दलांनी केलेल्या बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

Advertisement

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
दरम्यान, यास चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रातही दिसण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती व जालना या आठ जिल्हात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply