Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

झालाय रेकॉर्ड ब्रेक उन्हाळी पाऊस; पहा कोणत्या भागावर दिसलाय ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम

दिल्ली : देशात मे महिना तसा कडाक्याच्या उन्हाळ्याचाच आहे. या महिन्यात मुसळधार आणि अगदी रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण, आता यावरही विश्वास ठेवावा लागणार आहे. कारण, हवामानात होणारे बदल आणि तौक्ते चक्रीवादळाने ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट खरी करुन दाखवली आहे. या चक्रीवादळाच्या परिणामाने राजधानी दिल्लीत मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे.

Advertisement

देशात करोनाचे संकट असतानाच नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. हवामानात बदल होत असल्याने काही राज्यांना तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. त्यानंतर या वादळाचा उत्तर भारतातही परिणाम दिसून आला. या वादळामुळे उत्तर भारतातील काही राज्यांत मुसळधार पाऊस पडला. राजधानी दिल्लीतही मे महिन्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यातील मे महिन्यात येथे पावसाने मागील १३ वर्षातील पावसाचे सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. दिल्लीत मे महिन्यात १४४.८ मिमी पाऊस पडला आहे. मागील १३ वर्षांच्या काळात हा सर्वाधिक पाऊस आहे, भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली.

Advertisement

तौक्ते चक्रीवादळाचाही परिणाम शहरात दिसून आला. मागील आठवड्यातील बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात दिल्लीत ११९.३ मिमी पाऊस पडला. या दोन दिवसांतील पावसाने मागील १३ वर्षांतील मे महिन्यातील पावसाचे रेकॉर्ड मोडण्यास मदतच केली. तौक्ते चक्रीवादळ आता थांबले आहे. या वादळाने आठ राज्यांचे मोठे नुकसान केले. तर उत्तर भारतातील काही राज्यांत मुसळधार पाऊस पडला.  या वादळानंतर आता यास चक्रीवादळ येणार आहे. या वादळाचा पश्चिन बंगाल, ओडिशा या राज्यांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त अंदमान निकोबार बेट, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड या राज्यांनाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम राजधानी दिल्लीत दिसला. या वादळामुळे दिल्लीत दोन दिवसात ११९.३ मिमी इतका पाऊस पडला. खरेतर याच पावसाने मे महिन्यातील पावसाचे रेकॉर्ड मोडले आहे. हवामानात बदल झाल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडला आहे. हवामानातील बदलाचा अनुभव देशातील नागरिक बऱ्याच दिवसांपासून घेत आहेत. यामुळे नैसर्गिक संकटात वाढ झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply