Asia Cup 2023 News Update: Mumbai: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे सचिव जय शहा यांनी आशिया कप २०२३ आधी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात स्पर्धेसाठी जाणार नाही, असे जय शहा यांनी स्पष्ट केले. मुंबईत बीसीसीआयच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.
आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) या स्पर्धेसाठी बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानात (Pakistan) पाठवण्यास तयार असल्याचे वृत्त अनेक माध्यमांत आले होते. मात्र, जय शहा (Jay Shah) यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. भारत जर पाकिस्तानविरुद्ध कोणता सामना खेळणार असेल तर, ते ठिकाण दुसरेच असेल, असे जय शहा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
टी २० वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. २३ ऑक्टोबरला हा सामना मेलबर्न (Melbourne) क्रिकेट ग्राउंडवर होईल. पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या या सामन्याआधीच जय शहा यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) मोठा दणका दिला आहे. जय शहा यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जर टीम इंडिया आशिया कप स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नसेल तर, पीसीबीला अन्य कोणत्या देशात स्पर्धा भरवावी लागेल. तसे झाले तर ते ठिकाण यूएई असू शकते. याअगोदर त्या ठिकाणी २०१८ मध्ये क्रिकेटचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानात जर टीम इंडिया खेळली नाही तर, आशिया कप स्पर्धेचे मोठे नुकसान होऊ शकते.
टीम इंडिया १७ वर्षांपासून पाकिस्तानात गेली नाही
भारतीय संघाचा शेवटचा पाकिस्तान दौरा २००५-०६ मध्ये झाला होता. त्या दौऱ्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ४-१ अशा फरकाने पराभूत केले होते. आता त्याला १७ वर्षे लोटली आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानात पाय ठेवला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुरंगी मालिकाही मागील १० वर्षांपासून झाल्या नाहीत. २०१२ मध्ये पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यात दोन्ही संघांमध्ये टी २० आणि वनडे मालिका खेळवण्यात आली होती.
- हेही वाचा:
- BCCI President: अध्यक्षाची धुरा सांभाळताच दिले नवे बदलाचे संकेत; पहा काय असतील बदल
- Agriculture News: शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून दुहेरी दिवाळी भेट; पहा काय असेल ही भेट
- Health Tips: ‘या’ रुग्णांनी दुपार आणि रात्रीच्या जेवणानंतर करा हे काम; राहील आरोग्य चांगले
- T20 World Cup : अर्र.. श्रीलंका संघाला सुरुवातीलाच मोठा झटका; सामना जिंकला पण ‘हा’ खेळाडू पडला बाहेर..