दिल्ली – देशातील वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे विजेची वाढती मागणी लक्षात घेता सरकारने द्रवरूप नैसर्गिक वायू विदेशातून जवळपास तिप्पट किमतीने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. Torrent Power Ltd आणि GAIL India Ltd ने मे साठी LNG विकत घेतला आहे. देशात कोळशाच्या कमतरतेचा सामना करत असलेले पॉवर प्लांट एनएनजी वापरून जलद वीज निर्मिती करू शकतील, ज्यामुळे देशातील विजेचे संकट (Electricity Crisis) कमी होण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या एनएनजी तिप्पट किमतीत विकला जात आहे आणि जगाला एनएनजी विकत घेणे भाग पडले आहे. विशेषत: भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) सारख्या दक्षिण आशियाई देशांना जास्त दराने गॅस खरेदी करणे भाग पडले आहे.

एवढ्या मोठ्या किमतीत LNG खरेदी करणे भारतासाठी अभूतपूर्व आहे. भारत कधीच इतक्या जास्त किमतीत एलएनजी खरेदी करत नाही, परंतु देशातील विजेची सतत वाढणारी मागणी आणि कोळशाची टंचाई यामुळे देशवासीयांना वीज कपातीचा सामना करावा लागू नये म्हणून भारताला तिप्पट किमतीत एलएनजी खरेदी करावा लागत आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतातील एकूण वीज निर्मितीमध्ये गॅसचा वाटा फक्त 4 टक्के आहे. भारतातील 71 टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते. मात्र यंदा भारतात कोळशाची कमतरता जाणवत आहे. त्याच वेळी, देशातील अनेक भागांमध्ये तापमान विक्रम मोडत आहे, त्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या अखेरीस एलएनजीची दुसरी शिपमेंट ऑर्डर होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक भारतीय कंपन्या एलएनजीच्या किमतींची माहिती गोळा करत आहेत.

दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये कडक उन्हामुळे विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. मात्र कोळशाच्या पुरवठ्यात आलेल्या टंचाईमुळे नवे संकट निर्माण झाले असून अनेक राज्यांत वीजपुरवठा खंडित होत आहे. दरम्यान, या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार कोळशाची आयात (Coal Import) वाढ करण्याचा विचार करत आहे. जूनपर्यंत भारत परदेशातून 1.9 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या दिशेने कार्यवाही करत असल्याचे सांगण्यात आले.

वाढत्या उष्णतेमुळे वाढता वीजवापर लक्षात घेऊन केंद्र सरकार हे पाऊल उचलत आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा आयातदार देश आहे आणि विजेचा वाढता वापर पाहता, जास्त कोळसा मागवला जात आहे. रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की एप्रिलमधील तीव्र उन्हाळ्यामुळे भारतात गेल्या सहा वर्षांतील सर्वात भीषण वीज संकट (Electricity Crisis) निर्माण झाले आहे. उर्जा मंत्रालयाने म्हटले आहे, की केंद्र सरकारने सरकारी मालकीच्या युटिलिटीजना 22 दशलक्ष टन कोळसा आणि खाजगी पॉवर प्लांटना (Power Plant) 15.94 दशलक्ष टन आयात करण्यास सांगितले आहे.

कसे संपणार विजेचे संकट ? ; केंद्र सरकारने आखलाय ‘हा’ महत्वाचा प्लान; वाचा महत्वाची माहिती

Share.

Leave A Reply

Exit mobile version