India Trade Deficit: मुंबई : देशाचा डंका जगभरात गाजत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची भाजप पक्षाची टीम दररोज सांगत आहे. मात्र, सरकार सांगते तसेच सरकारी आकडे आहेत असेही नाही. कारण, जानेवारी 2023 मध्ये देशाची निर्यात आणि आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली आहे. या कालावधीत व्यापार तूट 17.75 अब्ज डॉलरच्या म्हणजे 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. वर्षभरपूर्वी म्हणजे जानेवारी 2022 मध्ये हा आकडा 17.42 अब्ज डॉलर होता. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जागतिक मागणीतील मंदीमुळे असे झालेले दिसत आहे. यंदा जानेवारीत निर्यात 6.58 टक्क्यांनी घसरून $32.91 अब्ज झाली आहे. त्याचबरोबर आयातही 3.63 टक्क्यांनी घसरून $50.66 अब्ज झाली आहे. यापूर्वीच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये निर्यात 12.2 टक्क्यांनी घसरून $34.48 अब्ज झाली होती.
- Spotify layoffs चा इतक्या मंडळींना झटका; पहा काय घडले कारण आणि काय म्हटले ceo Daniel यांनी | Bad News
- Israel Hamas War : युद्धविराम संपताच इस्त्रायलचा ‘एअरस्ट्राइक’; पहा, युद्धात काय घडलं?
- Healthy Diet Tips : पोटाची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ टिप्स फॉलो करा; 7 दिवसांत फरक नक्कीच!
- Vitamin E for Hair Care : केस गळती वाढली? नो टेन्शन, खोबरेल तेलात मिसळा ‘ही’ वस्तू; केस होतील घनदाट
- Exercise for Sharper Memory : काय, तुमचाही विसराळूपणा वाढलाय? मग, ‘या’ 5 ट्रिक ट्राय कराच
मात्र, 2022-23 या आर्थिक वर्षात पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जानेवारी या कालावधीत देशाच्या एकूण व्यापारी मालाची निर्यात 8.51 टक्क्यांनी वाढून $369.25 अब्ज झाली आहे. (Exports increased by 8.51 percent in April-January) या काळात आयात देखील 21.89 टक्क्यांनी वाढ नोंदवून $602.20 अब्जपर्यंत पोहोचली. मात्र, या काळात 233 अब्ज डॉलरची व्यापार तूट होती. दरम्यान, पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तांदूळ, तयार कपडे आणि रसायनांच्या निर्यातीत सकारात्मक वाढ झाली आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीत रशियामधून देशाची आयात तब्बल 384 टक्क्यांनी वाढून $37.31 अब्ज झाली. यामध्ये कच्च्या पेट्रोलियम तेलाचा सर्वाधिक वाटा आहे. वर्ष 2021-22 मध्ये रशिया हा भारताचा आठरवा सर्वात मोठा आयातदार भागीदार देश झाला होता. त्यावेळी फक्त 9.38 अब्ज डॉलर्सची आयात होती. आता रशिया हा पाचव्या क्रमांकाचा आयात करणारा देश झाला आहे. आता चीन-अमेरिकेनंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा क्रूड आयातदार आहे. दरम्यान, चीनमधून आयात 9% वाढून $83.76 अब्ज झाली. तर, UAE मधून 23.53 टक्के आणि अमेरिकेतून 25 टक्के वाढ झाली आहे. भारतातून होणाऱ्या निर्यातीत अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
याच दरम्यान, आता खुल्या बाजारात तीस दशलक्ष टन गहू विकण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात गव्हाच्या किमती सुमारे 5 रुपयांनी कमी झाल्या आहेत. सरकार गहू आणि आटा (गव्हाच्या पिठाच्या) किमतींवर आता बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी बुधवारी सांगितले आहे. दरम्यान, गरज भासल्यास दर कमी करण्यासाठी आणखी काही पावले उचलली जातील. तसेच गेल्या वर्षी मे महिन्यापासून गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता जानेवारीमध्ये खुल्या बाजार विक्री योजना (OMSS)याची घोषणा झाल्यापासून गव्हाच्या किमती खाली आल्याचे सचिवांनी म्हटले आहे. सध्या घाऊक भाव 3,000 रुपयांवरून 2,500 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. किरकोळ बाजारातही भाव 3,300-3,400 रुपयांवरून 2,800-2,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. शेतकरी विक्रेते आणि साठा केलेल्या व्यापाऱ्यांना याचा झटका बसणार आहे. (Wholesale and retail prices of wheat decreased by 5% due to sale in the open market)
दारमीन, एचडीएफसी बँक आणि यूको बँकेसह आणखी वीस बँकांनी विदेशी व्यापार रुपयात सक्षम करण्यासाठी विशेष व्होस्ट्रो खाती उघडली आहेत. तसेच आणखी अनेक देश या व्यवस्थेत स्वारस्य दाखवत आहेत. विदेशी व्यापार महासंचालनालयाचे (डीजीएफटी) प्रमुख संतोष कुमार सारंगी यांनी याबाबत बुधवारी सांगितले की, वाणिज्य मंत्रालय रुपयात विदेशी व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक बँकांच्या संपर्कात आहे. तर, वित्तीय सेवा विभाग आणि निर्यातदारही मंत्रालयाच्या थेट संपर्कात आहेत. या खात्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रमुख बँकांनी त्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची यादी निर्यातदारांसोबत शेअर केली असून विदेशी व्यापार रुपयात सुरू करणे ही नवीन व्यवस्था आहे. बँका, आरबीआय आणि निर्यातदारांशी सतत संपर्क ठेवला गेला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
बाजारातील आणखी महत्वाची घडामोड म्हणजे, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मध्ये विलीनीकरणासाठी सरकार महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) यांना स्टॉक एक्सचेंजमधून हटवू शकते. यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले असे अमर उजाला यांनी बातमीत म्हटले आहे. पुढील वर्षापर्यंत हे विलीनीकरण पूर्ण होईल. त्याआधीच एमटीएनएलला बाजारातून डीलिस्ट करावे लागेल. अर्थात एमटीएनएल फक्त मुंबई आणि दिल्लीत सेवा देत आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएनएलची 4जी सेवा सुरू होण्यासाठी सज्ज आहे. तसेच दूरसंचार विभागाने ट्रायला कॉल ड्रॉप्स तपासण्यासाठी आणि कॉल गुणवत्ता सुधारण्यासाठी सेवा मानके कडक करण्यास सांगितले आहे. (MTNL to be delisted for merger with BSNL)