India Sri Lanka Relation : भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेला मदतीसाठी हात पुढे केला आहे. वास्तविक (India Sri Lanka Relation) श्रीलंकेतील शहरात घरे आणि मूलभूत सुविधा विकसित करायच्या आहेत या कारणामुळे श्रीलंकेने भारताकडे अतिरिक्त आर्थिक मदतीची मागणी केली होती. भारताने श्रीलंकेचे ही मागणी मान्य करत श्रीलंकेला मोठी आर्थिक (Sri Lanka) मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील अनुराधापूर शहराच्या विकासासाठी भारताने पंधरा कोटी रुपयांच्या अतिरिक्त अनुदानावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
याआधी 21 मार्च रोजी त्यांच्या श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांबरोबर महत्वाच्या कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यात आली होती. यानंतर दोन्ही सरकारच्या अधिकाऱ्यांमध्येस सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर अतिरिक्त अनुदानावर सही करण्यात आली. 15 कोटी रुपयांची ही रक्कम अनुराधापूरमधील घरे आणि मूलभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?
India Sri Lanka Relation
भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीतील बदल लक्षात घेऊन भारत सरकारने नऊ प्रकल्पांना अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत अशी भारत सरकारची इच्छा आहे. या नऊ प्रकल्पांसाठी भारत सरकार 50% निधी देत आहे तर 50 टक्के निधी श्रीलंका सरकारच्या तिजोरीतून खर्च केला जाणार आहे.
दरम्यान, याआधी श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट उद्भवल्यानंतर भारताने श्रीलंकेला मोठी मदत केली होती. अन्नपदार्थांपासून आर्थिक मदतीपर्यंत सर्व प्रकारची मदत भारत सरकारने दिली होती. या काळात श्रीलंका आणि भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाचे करार देखील करण्यात आले होते. आता श्रीलंका या आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे तसेच देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत आहे. या संकटाच्या काळात भारताने श्रीलंकेला मोठी मदत केली होती. या मदतीबद्दल श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांनी भारत सरकारचे वेळोवेळी आभार देखील मानले होते.
India Sri Lanka Relation
China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च
दक्षिण आशियामध्ये श्रीलंका हा भारताचा मित्र देश आहे. सामरिक दृष्टीने श्रीलंका भारतासाठी अतिशय महत्त्वाचा देश आहे. मागील काही वर्षांपासून या देशात चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. या आधीच्या श्रीलंका सरकारने एक बंदर चीनला भाडेतत्त्वावर दिले होते. यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा छुप्या मार्गाने चीनी राज्यकर्ते श्रीलंकेच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत सरकारही चीनच्या या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे.