India Maldives Tension : मालदीवमधून भारतीय सैनिकांची वापसी पण, कर्मचाऱ्यांची एन्ट्री! पहा, प्लॅन काय?

India Maldives Tension : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव अजूनही निवळलेला (India Maldives Tension) नाही. आताही एक मोठी बातमी मालदीवमधून मिळाली आहे. मालदीव येथील अड्डू विमानतळावर तैनात भारतीय सैनिकांची तुकडी (Indian Soldiers) आज भारतात येण्यास रवाना झाली. भारतातून आलेल्या तांत्रिक पथकाला हेलिकॉप्टर संचालनाचे काम सोपवण्यात आले. मालदीव नॅशनल डिफेंस फोर्सच्या मीडिया अधिकाऱ्याने येथील अधाधू वृत्तसंस्थेला सांगितले की भारतीय सैनिक (India Maldives Conflict) जे अड्डू शहरात नियुक्त करण्यात आले होते ते आता भारतात माघारी गेले आहेत.

मालदीवमधील मुइज्जू सरकारचा हा मोठा विजय असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, विदेश नीतीच्या जाणकारांच्या मते असे म्हणता येणार नाही. कारण, मालदीवमधून जरी भारतीय सैनिक माघारी परतरणार असले तरी भारतीय कर्मचारी येथे राहणार आहेत. आता भारतीय सैनिकांच्या गैरहजेरीत जर चीन येथे त्यांच्या सैनिकाला नियुक्त करू लागला तर या भारतीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती भारताला मिळणार आहे.

India Maldives Row : मालदीवला भारतीयांचा झटका, ‘लक्षद्वीप’कडे मोर्चा; मालदीवचे ‘इतके’ नुकसान

India Maldives Tension

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी याच मुद्द्यावर निवडणूक लढली होती. आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. मुइज्जू यांना चीन समर्थक म्हणून ओळखले जाते. भारताबरोबर वाद वाढल्यानंतर चीनने (China) या देशात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.

सत्तेत आल्यानंतर मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना माघारी जाण्यास सांगितले होते. यासाठी भारत आणि मालदीव यांच्यात अनेक वेळा चर्चा झाली. यानंतर भारतीय सैनिकांच्या माघारीसाठी रुपरेषा तयार करण्यात आली. मात्र हे करत असताना असैन्य कर्मचारी नियुक्त करण्यास मालदीव सरकारने सहमती दर्शवली.

India Maldives Tension

यानंतर भारतीय कर्मचाऱ्यांचे पथक 26 फेब्रुवारी रोजी मालदीवमध्ये दाखल झाले. या पथकाने सैन्याकडून हेलिकॉप्टर संचालनाचे काम आपल्या हातात घेतले. या पथकाद 26 जणांचा समावेश आहे. सक्षम तांत्रिक कर्मचारी मालदीवमध्ये विमान आणि हेलिकॉप्टरचे संचालन करतील असे भारत सरकारने सांगितले होते. तर मालदीव सरकारने स्पष्ट केले होते की या पथकात फक्त भारतीय नागरिक असतील याची खात्री केली जाईल.

India Maldives Relation : मालदीवचा भारताला झटका! चीनची साथ मिळताच घेतला ‘हा’मोठा निर्णय

Leave a Comment