India Maldives Tension | भारतानंतर चीनचाही मालदीवला दणका, पैशांचं गणितच बिघडलं; पहा, काय घडलं?

India Maldives Tension : भारत आणि मालदीव यांच्यातला वाद अजूनही कायम (India Maldives Tension) आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) लक्षदीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला होता. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. डिसेंबर 2023 पर्यंत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर मात्र या संख्येत वेगाने घट नोंदवण्यात आली. आता भारतीय पर्यटक संख्येच्याबाबतीत सहाव्या क्रमांकावर आहेत.

सध्याच्या घडीला मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये चीन, रशिया, ब्रिटन, इटली आणि जर्मनी या देशांच्या पर्यटकांच्या संख्या जास्त आहे. मात्र चिनी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 33 हजार 897 चिनी पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती. मार्च महिन्यात ही संख्या मात्र घटल्याचे दिसून आले. या महिन्यात फक्त 13 हजार 609 चिनी पर्यटकांनी मालदीवला भेट दिल्याची नोंद घेण्यात आली.

India China Relations : चीनचा डाव! भारतानेही दिले रोखठोक उत्तर; पहा, पुन्हा का धुमसतोय भारत-चीन वाद?

India Maldives Tension

इमिग्रेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रशियाचे पर्यटक मोठ्या संख्येने मालदीवमध्ये येत आहेत. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार मालदीवमध्ये 1 लाख 94 हजार 222 पर्यटक आले होते. मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 20 हजार 708 पर्यटकांची वाढ दिसून आली. 2024 च्या पहिल्या तीन महिन्यात मालदीवमध्ये पर्यटकांची संख्या 6 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. मालदीवमधील स्थानिक मीडिया अधाधूच्या एका रिपोर्टनुसार देशाच्या इतिहासात कोणत्याही तिमाहीत पर्यटकांची ही वाढ सर्वाधिक आहे.

मागील महिन्यात सर्वात जास्त पर्यटक रशियातून आले होते. तसे पाहिले तर चिनी पर्यटक वर्षाच्या दरम्यान एक नंबरवर कायम राहिले. यानंतर ब्रिटेन, इटली आणि जर्मनी या देशांचा नंबर आहे. मार्च महिन्यात जर्मनीमधून 21 हजार 176 इटलीमधून 18 हजार 897 तर चीनमधून 13 हजार 609 पर्यटकांनी मालदीवला भेट दिली होती.

India Maldives Tension

2024 बद्दल बोलायचे झाले तर 8 एप्रिलपर्यंत चिनी पर्यटकांची संख्या 71 हजार 136 इतकी नोंदवण्यात आली होती. 65 हजार 598 पर्यटकांसह रशिया दुसऱ्या क्रमांकावर होता. ज्यावेळी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनचा दौरा केला होता त्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. परंतु आता पुन्हा चिनी पर्यटकांची संख्या घटली आहे. यामागे नेमके कोणते कारण आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च

दुसरीकडे भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध अजूनही आणलेले आहेत. या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. दोन्ही देशांतील वाढता तणाव पाहता चीनच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा मालदीवला मदत करण्यावर भर दिला आहे. या दोन्ही देशांच्या तणावात चीन आपला स्वार्थ साधून घेत आहे. परंतु मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या या धोरणाविरोधात देशातील स्थानिक विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता मालदीवच्या सत्ताधाऱ्यांच्या चीनबद्दलच्या धोरणात कोणताही बदल झाल्याचे दिसत नाही.

Leave a Comment