India Maldives Row : मालदीवला भारतीयांचा झटका, ‘लक्षद्वीप’कडे मोर्चा; मालदीवचे ‘इतके’ नुकसान

India Maldives Row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचा (India Maldives Row) फटका मालदीवलाच बसत आहे. मालदीव पर्यटनासाठी जगभरात ओळखला जातो. येथील निसर्ग सौंदर्य वाखाणण्याजोगे आहेत. इतकेच नाही मालदीवची (Maldives) सगळी अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबून आहे. भारतातूनही मोठ्या संख्येने (India) पर्यटक मालदीवला जात होते. परंतु, मागील काही दिवसांपासून दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान त्यांच्याबाबत (Lakshadweep) वादग्रस्त वक्तव्ये केली होती. तेव्हापासून हा वाद सुरू झाला. यानंतर संतप्त झालेल्या भारतीय नागरिकांनी मालदीवरच बहिष्कार टाकला. मालदीवला जाणेच बंद केले. याचा मोठा फटका मालदीवच्या पर्यटन उद्योगाला बसला आहे.

मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताबरोबच्या राजनैतिक वादामुळे मालदीवला येणाऱ्या भारतीय पर्यटकांत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च 2023 आणि मार्च 2024 या वर्षभराच्या काळात मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येच्या आधारे ही माहिती समोर आली आहे.

India Maldives Relation : मालदीवचा भारताला झटका! चीनची साथ मिळताच घेतला ‘हा’ मोठा निर्णय

India Maldives Row

मागील वर्षातील मार्च महिन्यात मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर होती. आता सहाव्या क्रमांकावर गेली आहे. या वर्षात मार्चमध्ये फक्त 27 हजार भारतीय पर्यटकांनी मालदीव व्हिजीट केली. प्रसारमाध्यमांतील अहवालांच्या आधारे पाहिले तर मार्च 2024 मध्ये 27 हजार 224 पर्यटकांच्या तुलनेत मार्च 2023 मध्ये 41 हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी मालदीव दौरा केला होता. एकाच वर्षात या संख्येत 33 टक्क्यांची घट झाली आहे.

यामागे महत्वाचे कारण दोन्ही देशांतील बिघडलेल्या संबंधांचे आहे. भारतीय पर्यटकांनी आता आपल्याच देशातील लक्षद्वीप बेटांकडे मोर्चा वळवला आहे. येथील निसर्गसौंदर्यही मालदीवसारखेच आहे. येथे वाढलेली पर्यटकांची संख्या मालदीवला नुकसान देणारी ठरली आहे. तर दुसरीकडे चीन मालदीवच्या मदतीला आला आहे. यावर्षी मार्च महिन्यात सुमारे 54 हजार चीनी पर्यटकांनी मालदीवला भेट दिली.

China Maldives Relation : मोठी डील पक्की! चीन मालदीवला करणार ‘ही’ मदत; भारतासाठी धोक्याची घंटा

India Maldives Row

या आठवड्याच्या सुरुवातीला मालदीवने भारतासोपबत हायड्रोग्राफीक सर्वेक्षण करण्यासाठी केलेल्या कराराचे नुतनीकरण करणार नाही असा निर्णय घेतला. या निर्णयाची घोषणा राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी केली आहे. चीनबरोबर मालदीव नवीन करार करत आहे. चीननेही या देशाला मदतीसाठी हात पुढे केला आहे. भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचा चीन स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीने फायदा घेत आहे.

Leave a Comment