India Maldives Relation : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव अजूनही (India Maldives Relation) निवळलेला नाही. भारताबरोबर संबंध बिघडल्यानंतर मालदीवने चीनबरोबर (China) घरोबा केला आहे. चीनकडून मालदीवला भरभरून मदत केली (Maldives Row) जात आहे. त्यामुळे मालदीवची खुमखुमी वाढली आहे. भारताविरोधात निर्णय घेण्याचा सपाटाच मालदीवच्या राज्यकर्त्यांनी सुरू केला आहे. आताही आणखी एक निर्णय येथील सरकारने घेतला आहे. मालदीव जलविज्ञान सर्वेक्षणासाठी भारतासोबतच्या कराराचे नुतनीकरण करणार नाही आणि सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा यंत्रसामग्री हस्तगत करण्याची योजना आखली जात आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी जाहीर केले आहे की मालदीवच्या जलक्षेत्रसाठी चोवीस तास काम करणारी यंत्रणा याच महिन्यात स्थापित करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे.
चीनने मालदीवबरोबर संरक्षण सहकार्य करारावर सही केल्यानंतर हा घटनाक्रम समोर आला आहे. चीन समर्थक मुइज्जू मागील वर्षी सत्तेत आले होते. तेव्हापासून भारत आणि मालदीव यांचे संबंध ताणले गेले आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये शपथ घेतल्यानंतर मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांनी माघारी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.
China Maldives Relation : मोठी डील पक्की! चीन मालदीवला करणार ‘ही’ मदत; भारतासाठी धोक्याची घंटा
India Maldives Relation
हायड्रोग्राफिक संशोधन करण्यासाठी आवश्यक सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे मालदीवला पाण्याखालील सर्वेक्षण करता येईल. मुइज्जू यांच्या आधीच्या सरकारने यासाठी भारत सरकारबरोबर करार केला होता. हाच करार पुन्हा नुतनीकरण केला जाणार नाही, असे आताच्या मुइज्जू सरकारने स्पष्ट केले आहे.
India Maldives Relation
मुइज्जू सरकारने याआधी स्पष्ट केले होते की मागील सरकारांनी भारतासोबत केलेल्या 100 पेक्षा जास्त करारांचे पुनरावलोकन केले जात आहे. भारताच्या हायड्रोग्राफी कार्यालयाच्या सहकार्याने सर्वात अलीकडील हायड्रोग्राफीक सर्वेक्षण जानेवारी 2021 मध्ये करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 2019 मधील दौऱ्यात यासंबंधीचा करार करण्यात आला होता. माजी राष्ट्रपतींनी या हायड्रोग्राफी सेवेला सुविधा देण्यासाठी आणि संरक्षण मंत्रालयाला सुविधा देण्यासाठी संसदेची मंजुरीही मिळवली होती.
China Sri Lanka Relation : भारताचा आदेश अन् छोटा देशही चीनला भिडला; पहा, कशामुळे ‘चीन’ भडकला?
India Maldives Relation
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यावर मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतापलेल्या भारतीयांनी मालदीवचा बहिष्कार करण्यास सुरुवात केली होती. या बहिष्कारामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. यानंतर सरकारने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई देखील केली होती. तेव्हापासून मालदीव आणि भारत या दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. China Maldives Relation