India-Canada Tensions : काही दिवसांपूर्वी झालेल्या G20 शिखर परिषदेनंतर भारत आणि कॅनडामध्ये सर्व काही बदलताना दिसत आहे. यातच आता भारताने कॅनडाच्या कारवाईवर प्रत्युत्तर देत कॅनडाने राजपूतला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने कॅनडाच्या राजदूत यांना 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. रिपोर्टनुसार कॅनडाच्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर कॅनडाने या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले असून यादरम्यान भारताने कॅनडाच्या राजदूत यांना 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
कॅनडाने आरोप करून भारतीय राजकारण्यांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देत कॅनडाचे राजदूत यांना देश सोडण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आले आहे. भारताने नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या कॅनेडियन राजदूत यांना या निर्णयाची माहिती दिली आहे आणि 5 दिवसांत देश सोडण्यास सांगितले आहे.