India Canada Tension | कॅनडाला झटका! ‘त्या’ प्रकरणात भारताच्या बाजूने आला अहवाल; पहा, काय घडलं?

India Canada Tension : कॅनडातून महत्वाची बातमी समोर आली (India Canada Tension) आहे. 2021 च्या निवडणुकीत भारतीय हस्तक्षेपाचा दावा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांनी एका साक्षीदार म्हणून ही माहिती दिली कॅनडाच्या अधिकारांनी सांगितले की कॅनडाच्या फेडरल निवडणुकीत भारताच्या भूमिकेबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. 2021 च्या निवडणुकीवर देखील करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुनावणीपूर्वी साक्ष दिली आहे.

खरं तर कॅनडाच्या सिक्युरिटी इंटेलिजन्स एजन्सीने भारत आणि चीनवर कॅनडामध्ये होणाऱ्या फेडरल निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप केला होता. एजन्सीने म्हटले आहे की भारत सरकारच्या प्रॉक्सी एजंट निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेपाशी संबंधित घडामोडी केल्या होत्या. या एजंटने काही भागात भारत समर्थक उमेदवारांच्या बाजूने काम केले होते.

Canada Accused Pakistan : कॅनडाच्या निशाण्यावर पाकिस्तान; सरकारच्या ‘त्या’ दाव्याने पाकिस्तानात खळबळ!

India Canada Tension

याप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही (Justin Trudeau) आज तपास समिती समोर हजर राहणार आहेत. तपास समितीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार असल्याचे जस्टिन ट्रूडो यांनी सांगितले. केनेडियन मीडियामध्ये चौकशी समितीचे नेतृत्व न्यायाधीश करत आहेत. सुनावणी दरम्यान त्यांनी अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे जबाब घेतले आहेत. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या आधीच कॅनडांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते.

ते म्हणाले होते की भारताविरोधातील मीडिया रिपोर्ट्स पाहिल्या आहेत. कॅनडाने केलेले सर्व आरोप निराधार आहेत. कोणत्याही लोकशाही देशाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणे भारताच्या धोरणात बसत नाही. या उलट कॅनडा आपल्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत आहे. या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील (India Canada Tension) तणाव वाढलेला आहे.

China Taiwan Conflict : तैवानच्या संकटात चिन्यांनी साधला डाव; पहा, काय केलाय कारनामा?

India Canada Tension

Leave a Comment