India Canada Tension : भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक वादात (India Canada Tension) मोठी बातमी समोर आली आहे. कठोर भूमिका घेत भारताने कॅनडातील आपल्या 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. फायनान्शिअल टाईम्सने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार भारताने कॅनडाला आपल्या 41 राजनैतिकांना 10 ऑक्टोबरपर्यंत परत बोलावण्यास सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप करणारे वक्तव्य केले होते. तथापि, भारताने (India) हे दावे पूर्णपणे नाकारले आहेत. यानंतरत खऱ्या अर्थाने दोन्ही देशांतील वादाला सुरुवात झाली.
कॅनडाचे भारतात 32 राजनयिक
फायनान्शिअल टाईम्सने सरकारी सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, भारताने 10 ऑक्टोबरनंतर देश सोडण्यास सांगितले गेलेल्या कॅनडाच्या मुत्सद्दींची राजनैतिक सवलत रद्द करण्याची धमकी दिली आहे. कॅनडाचे 62 राजनैतिक अधिकारी भारतात आहेत. कॅनडाच्या मुत्सद्यांची एकूण संख्या 41 वर आणावी असे भारताने म्हटले आहे.
कॅनडाने निराश केले
भारत आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, कॅनडाने सर्वप्रथम भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध हिंसाचार आणि धमकावण्याचे वातावरण निर्माण केले. ते म्हणाले की, कॅनडातील फुटीरतावादी गटांच्या उपस्थितीने भारताला निराश केले आहे.
त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भेटीत हा मुद्दा उपस्थित केला होता. ब्लिंकेन म्हणाले की, या घटनेमागे जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे.