दिल्ली – श्रीलंकेतील आर्थिक संकट (Sri Lanka Economic Crisis) अजूनही मिटलेले नाही. श्रीलंका सरकार दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासही असमर्थ आहे. मदत म्हणून जगभरातून जीवनावश्यक वस्तू श्रीलंकेला पाठवल्या जात आहेत. यामध्ये, भारताने श्रीलंकेला 3 अब्जाहून अधिक मानवतावादी मदत दिली आहे. कोलंबोमधील भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, तांदूळ, दूध पावडर आणि आवश्यक औषधे मदत म्हणून दिली आहेत.
अभूतपूर्व आर्थिक संकट कमी करण्यासाठी श्रीलंकेला मदत पुरवणाऱ्या पहिल्या काही देशांपैकी भारत होता. श्रीलंकेला अन्न, इंधन, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी 1 अब्ज डॉलरचे सवलतीचे कर्ज (Loan) भारताने दिले आहे. मे महिन्यात, श्रीलंकेत अन्नधान्य चलनवाढीचा दर 57.4 टक्क्यांवर होता, तर प्रमुख अन्नपदार्थ तसेच स्वयंपाक, वाहतूक आणि उद्योगांसाठी इंधनाची टंचाई कायम आहे, दररोज वीज कपात सुरू आहे. चलनाचे 80 टक्के अवमूल्यन (मार्च 2022 पासून), परकीय गंगाजळीचा अभाव आणि आंतरराष्ट्रीय कर्ज दायित्वांची पूर्तता करण्यात देशाचे अपयश यांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
दरम्यान, श्रीलंकेवर तब्बल 56 अब्ज डॉलरचे बाह्य कर्ज (56 Billion Dollar Foreign Debt) आहे. त्यातील दहा टक्के कर्ज एकट्या चीनचे आहे. त्याच्यासाठी ही रक्कम इतकी मोठी आहे की ती परत करण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. या कर्जावर श्रीलंकेला दोन अब्ज डॉलर्स फक्त व्याजाच्या (Interest On Loan) स्वरूपात द्यावे लागतील.
या परिस्थितीसाठी श्रीलंकेचे तज्ज्ञ तेथील सरकारला जबाबदार धरत आहेत. मात्र या परिस्थितीचा सर्वाधिक वाईट परिणाम तेथील सर्वसामान्य जनतेवर होत (Effect On Common Citizen) असल्याचेही वास्तव आहे. देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई (Shortage Of Food) आहे. याशिवाय औषधांचीही (Medicines) मोठी कमतरता आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. परकीय कर्जाच्या परतफेडीचा विचार केला तर श्रीलंकेकडे 50 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा (Foreign Reserve) उरला नाही. अशा परिस्थितीत जुलैमध्ये विविध वित्तीय संस्था श्रीलंकेला डिफॉल्टर (Defaulter) म्हणून घोषित करण्याची दाट शक्यता आहे.
चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..