Independence Day 2023 : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच तिरंग्याची मागणी देशातील प्रत्येक शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
ही मागणी लक्षात घेऊन आता पोस्ट ऑफिस फक्त 25 रुपयांमध्ये घरपोच तिरंगा देत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या फक्त एका दिवसात तिरंगा लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.
जर तुम्हाला देखील घरपोच तिरंगा हवे असेल तर तुम्ही www.indiapost.gov.in या वेबसइटवरून ऑनलाइन बुकिंग देखील करु शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या पोस्ट ऑफिस देखील “हर घर तिरंगा” मोहिमेचा प्रचार करत आहे.
तिरंग्यासाठी स्वतंत्र काउंटर
पोस्ट ऑफिसमध्ये तिरंग्यासाठी स्वतंत्र काउंटर बनवण्यात आले आहेत, तेथून तुम्ही ते खरेदी करू शकता. येथे कामासाठी येणारे लोक कोणत्याही त्रासाशिवाय तिरंगा घेऊन जाऊ शकतात. दुसरीकडे, ज्यांना बाजारात खरेदीसाठी वेळ नाही अशा लोकांना पोस्ट ऑफिसकडून 20/30 इंचाचा तिरंगा पाठवला जात आहे.
त्यांना घरी पोहोचवण्यात पोस्टमन महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. स्वातंत्र्याच्या उत्सवादरम्यान प्रत्येक घराघरात राष्ट्रध्वज पोहोचावा यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहीम आणखी वाढविण्याचे काम पोस्ट ऑफिसवर सोपविण्यात आले आहे.
25 रुपयांना तिरंगा दिला जात आहे
शहरवासीयांना हा तिरंगा अवघ्या 25 रुपयांत खरेदी करता येईल. पोस्ट ऑफिसच्या म्हणण्यानुसार, पोस्टमन ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना तिरंगा पोहोचवत आहेत. “हर घर तिरंगा” कार्यक्रमाचा प्रचार आणि समर्थन करण्यासाठी पोस्ट ऑफिसद्वारे ही होम डिलिव्हरी सेवा लोकांना दिली जात आहे.
काय आहे ‘हर घर तिरंगा’ मोहीम?
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त “हर घर तिरंगा” मोहीम सुरू केली.
भारत सरकारच्या मते लोकांमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढवणे आणि त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.