IND vs WI T20 Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी (IND vs WI) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.
यशस्वी-तिलक वर्मा यांना संधी
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघात समावेश केल्यानंतर यशस्वी जैस्वालला टी-20 संघातही संधी देण्यात आली आहे. IPL 2023 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल यशस्वी जैस्वालला पुरस्कृत करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तिलक वर्मालाही टीम इंडियाने पहिल्यांदाच संधी दिली आहे. तिलकने इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात 11 सामन्यात 164 च्या स्ट्राइक रेटने 343 धावा केल्या होत्या. त्याचवेळी यशस्वीने 14 सामन्यात 625 धावा केल्या.
कोहली-रोहितला विश्रांती
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारतीय निवड समितीने विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे. संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर टी-20 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची पहिल्यांदाच संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजू सॅमसनलाही संघात संधी देण्यात आली आहे.
अर्शदीप-बिश्नोईचे पुनरागमन
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी कॅरेबियन संघाविरुद्ध निवडलेल्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून सुरू होणार असून शेवटचा सामना 13 ऑगस्टला होणार आहे.
T20 मालिकेचे वेळापत्रक
भारतीय संघाला पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा सामना करावा लागणार आहे. 3 ऑगस्टपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर दुसरा सामना 6 ऑगस्टला, तिसरा सामना 8 ऑगस्टला होणार आहे. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी खेळल्या जाणार्या शेवटच्या दोन सामन्यांचे आयोजन अमेरिका करणार आहे. टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघ कॅरेबियन संघाशी दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.