IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी 20 सामना उद्या (शनिवार) होणार आहे. वेस्टइंडिज संघ सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. म्हणजेच उद्याचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर संघ हरला तर मालिकाही हाताबाहेर जाईल. त्यामुळे टीम इंडियाला पुढील दोन सामन्यांमध्ये कोणतीही चूक करण्याची संधी नाही.
चौथ्या सामन्यात (IND vs WI) दोन्ही संघांचे प्लेइंग 11 काय असू शकतात हे निश्चित नाही. मात्र तरीदेखील काही फार महत्वाचे बदल होतील असे वाटत नाही. टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. अन्यथा मालिका जिंकता येणार नाही.
दरम्यान, पहिल्या दोन टी 20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. तिसरा सामना संघासाठी करो या मरोच्या स्थितीचा होता. या सामन्यात संघाने चांगला खेळ केला त्यामुळे विजय मिळवता आला. सध्या पाच सामन्यांच्या या मालिकेत विंडीजचा संघ 2-1 ने आघाडीवर आहे. पुढील दोन्ही सामन्यात भारताला विजयी होण्याची गरज आहे. एक जरी सामना गमावला तरी मालिका विजय साकारता येणार नाही. फक्त मालिकेत बरोबरी करता येईल.
भारताचे संभाव्य प्लेइंग 11
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.
वेस्ट इंडिजचे संभाव्य प्लेइंग 11
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (wk), रोव्हमन पॉवेल (c), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.