IND vs WI 3rd T20: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज विरुद्ध पाच t20 सामन्याची मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये वेस्टइंडीज संघ 2-0 ने पुढे आहे.
आता भारतीय संघाला गयानामध्ये तिसरा सामना खेळायचा आहे. जर भारतीय संघाने तिसरा सामना जिंकला नाही तर भारतीय संघ 12 टी-20 मालिकेनंतर द्विपक्षीय मालिका गमावेल. हा सामना भारतात थेट पाहता येईल. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा T20 सामना कधी, कुठे आणि कसा लाइव्ह पाहता येईल ते या लेखात जाणुन घ्या.
IND vs WI 3rd T20I लाइव्ह कुठे पाहायचा?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा तिसरा T20 सामना दूरदर्शनच्या राष्ट्रीय आणि विविध प्रादेशिक वाहिन्यांवर भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय फॅनकोड अॅप आणि वेबसाइट आणि जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरही चाहते सामन्याच्या थेट प्रवाहाचा आनंद घेऊ शकतात.
IND vs WI 3rd T20I कुठे आणि कधी खेळला जाईल?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी या मैदानावर दुसरा टी-20 सामनाही खेळवण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
IND vs WI T20I मालिकेसाठी भारतीय संघ
यशस्वी जैस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (क), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, रवी बिश्नोई आणि तिलक वर्मा .
IND vs WI T20I मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ
काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (wk), शाई होप, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (c), जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय, ओशान थॉमस, ब्रँडन किंग, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड.