मुंबई – भारत आणि श्रीलंका (Ind vs Sri lanka) यांच्यातील दिवस-रात्र कसोटीत (Day – Night Test) श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) शानदार फलंदाजी केली आहे. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात शानदार 92 धावा केल्या आणि भारताची धावसंख्या 252 पर्यंत नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, अय्यरचे डे-नाईट कसोटीत पहिले शतक झळकावता आले नाही. आतापर्यंत डे-नाईट कसोटीत शतक झळकावणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. अय्यरला या विशेष यादीत स्थान मिळण्याची संधी होती, पण 92 धावांच्या स्कोअरवर त्याला जयविक्रमने यष्टीचीत केले. यासह अय्यर विक्रमी शतक झळकावण्यास मुकला.
या सामन्यात आतापर्यंत अर्धशतक झळकावणारा श्रेयस एकमेव फलंदाज आहे. त्याच्याशिवाय दोन्ही संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलेले नाही.
अय्यरने भारतीय डाव सांभाळला
या सामन्यात श्रेयस अय्यरने 98 चेंडूत 92 धावा केल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. अय्यरच्या शानदार खेळीमुळे या सामन्यात भारत स्वस्तात बाद होण्यापासून वाचला. श्रेयस फलंदाजीला आला तेव्हा भारताची धावसंख्या चार विकेट गमावून 86 धावा होती, पण अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा संघाची धावसंख्या 252 धावा होती. टीम इंडियाच्या नऊ विकेट पडल्या होत्या. अशा परिस्थितीत श्रेयसला मोठे फटके खेळावे लागले आणि या प्रयत्नात तो बादही झाला.
Kharediwala फॉर एव्हरीवन..! होय, आता आम्ही घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
या सामन्यात भारताची स्थिती मजबूत
या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आला आहे. पहिल्या डावात 252 धावा केल्यानंतर भारताने श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ आतापर्यंत केवळ 86 धावा करू शकला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताकडे मोठी आघाडी होण्याची शक्यता आहे आणि टीम इंडिया तीन दिवसांत हा सामना जिंकू शकेल. आता श्रीलंकेला पुनरागमन करण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अप्रतिम कामगिरी करावी लागणार आहे.