मुंबई – भारत आणि श्रीलंका (Ind vs Sri lanka) यांच्यातील टी-20 मालिकेतील (T20 Series) दुसरा सामना पावसामुळे वाहून जाऊ शकतो. सामन्यापूर्वी संपूर्ण हिमाचल प्रदेशातील हवामान (Himachal Pradesh weather) खूपच खराब आहे. राजधानी शिमल्यातही बर्फवृष्टी होत आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारेही सुरू असून, मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, धर्मशाळेत दिवसभर पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दुसरा टी-20 पावसामुळे उद्ध्वस्त होऊ शकतो.
भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची त्यांना इच्छा असेल, मात्र हवामान भारताच्या आशा खराब करू शकते.
लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 62 धावांनी शानदार विजय नोंदवला. भारताकडून इशान किशन, श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यांनी चांगली फलंदाजी केली. त्याचवेळी भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील सर्व खेळाडूंनी चेंडूसह उत्कृष्ट कामगिरी केली.
धर्मशाळेत सकाळपासून पाऊस सुरू
धर्मशाळेत शनिवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी संततधार पाऊस सुरू असून हा पाऊस दिवसभर सुरू राहू शकतो. त्यामुळे सामना होण्याची शक्यता फारच कमी आहे. येथे पावसाची शक्यता 60 टक्क्यांहून अधिक आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे ग्राऊंड स्टाफसाठी अधिक समस्या निर्माण होतील आणि त्यांना ग्राउंड कोरडे करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल.
Kharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..!
सलग 11 वा सामना जिंकण्याच्या भारताच्या आशा पावसामुळे खराब होऊ शकतात. टीम इंडियाने लागोपाठ 10 सामने जिंकले असून धर्मशाला येथील दोन्ही सामने जिंकून सलग 12 टी-20 सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी करू शकते. दुसरा टी-20 सामना वाहून गेल्यावर भारताला हा विक्रम करण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागेल, कारण यानंतर भारत श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर आयपीएल सुरू होईल.