IND vs PAK: 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप 2023 सूरु होणार आहे. या स्पर्धेमध्ये 14 ऑक्टोंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आला आहे . यातच आता पाकिस्तान संघाचा स्टार फलंदाज अब्दुल्ला शफीकने विश्वचषकापूर्वी भारताला मोठा इशारा दिला आहे.
विश्वचषकात भारतासोबतच्या लढतीबद्दल बोलताना अब्दुल्ला शफीक म्हणाला, “आम्ही भारताविरुद्ध खेळण्यासाठी खूप उत्सुक आहोत, पण आमच्यासाठी हा फक्त एक सामान्य सामना असणार आहे. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम वेगवान आक्रमण आहे आणि आम्ही 300 धावांचा पाठलाग करू शकतो.
शरीफ यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, त्यांना रोहित शर्माच्या संघाला सांगायचे आहे की त्यांच्याकडे भरपूर वेगवान गोलंदाज आहेत. शरीफ या गोलंदाजांच्या वेगाने गर्जना करत आहेत.
भारत-पाकिस्तान यांच्यातील आतापर्यंतच्या लढतीत भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी यांच्यात चुरशीची लढत होत असून, त्यात कधी भारत तर कधी पाकिस्तान जिंकतो. आता पाकिस्तानची गोलंदाजी किंवा भारताची फलंदाजी कोणावर वर्चस्व गाजवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी आशिया कप 2023 मध्ये भिडतील.